शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

453 कोटी जमा करा, अन्यथा तुरुंगात जा; अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:02 IST

सर्वोच्च न्यायालयानं रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना मोठा झटका दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना मोठा झटका दिला आहे. एरिक्सन इंडियानं केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान अनिल अंबानींना 453 कोटी रुपयांची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. एरिक्सन इंडियानं 550 कोटी रुपये रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे बाकी असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयानं याचिकेवर सुनावणी करत एरिक्सन इंडियाच्या बाजूनं निर्णय दिला आहे. तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना एरिक्सनचे पैसे व्याजासकट देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या अनिल अंबानींसह दोन संचालकांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयानं अनिल अंबानी आणि त्यांच्या दोन संचालकांना चार आठवड्यांच्या आत एरिक्सनचे 453 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिलेल्या मुदतीच्या आत अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीच्या 'त्या' दोन संचालकांनी चार आठवड्यांच्या आत पैसे न भरल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. टेलिकॉम डिव्हाइस तयार करणारी कंपनी एरिक्सननं अनिल अंबानी आणि कंपनीचे संचालक सतीश सेठ, रिलायन्स इन्फ्राटेलचे अध्यक्ष छाया विरानी आणि एसबीआयचे अध्यक्षांविरोधात न्यायालयात तीन अवमानता याचिका दाखल केल्या होत्या. तत्पूर्वी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या पीठानं 13 फेब्रुवारीला सुनावणी केली होती, त्यावेळी त्यांनी निर्णय राखून ठेवला होता. रिलायन्स ग्रुपकडे राफेल करारासाठी पैसे आहेत, परंतु ते आमचे 550 कोटी रुपये देऊ शकत नाही, असा आरोप एरिक्सन इंडियानं केला होता. परंतु रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम)ची रिलायन्स जिओशी संपत्तीसंदर्भात असलेली बोलणी फिस्कटल्यानं एरिक्सनचे पैसे देता न आल्याची खंतही अनिल अंबानींनी बोलून दाखवली आहे.

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानी