शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाचा 'गुन्हेगार' मोकाटच, सुटकेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By admin | Updated: December 21, 2015 14:40 IST

निर्भया बलात्कार व खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेच्या निर्णयाला विरोध करणारी महिला आयोगाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने 'तो' अल्पवयीन गुन्हेगार आता बाहेरच राहणार आहे. या बालगुन्हेगाराच्या सुटकेच्या निर्णयाला विरोध करणारी महिला आयोगाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 
न्यायालयाला तुमची चिंता समजते, मात्र सध्याच्या कायद्यानुसार, त्या गुन्हेगाराला तीन वर्षांपेक्षा अधिक काळ तुरूंगात ठेवणे शक्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली व त्या गुन्हेगाराच्या सुटकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला. अलपवयीन आरोपीची सुटका कायद्यानुसारच करण्यात आली असून कायद्यात सुधारणा होईपर्यंत न्यायालय काहीही करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 
तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली होती. महिला आयोगाने त्याच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एका एनजीओकडे त्या गुन्हेगाराचा ताबा देण्यात आला असून त्याला अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहे.
लोकांच्या मनातील संताप पाहता बाहेर आल्यावर या गुन्हेगाराच्या जिवाला धोका आहे. बालसुधारगृहात असताना यूपीतील एका बालगुन्हेगाराने त्याच्या डोक्यात धार्मिक कट्टरवादाचे भूत भरविले असल्याचा ‘आयबी’चा अहवाल आणि तीन वर्षे सुधारगृहात राहून तो  गुन्हेगार सुधारल्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सुटल्यावर पुन्हा तो तेच गुन्हे करण्याची भीती आहे, या तीन मुद्यावर महिला आयोगाने याचिका दाखल करत त्या गुन्हेगाराची सुटका न करण्याची मागणी केली होती.