शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मोदींच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी सैनिक तेज बहादूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Updated: November 24, 2020 17:05 IST

Tej Bahadur News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती.

ठळक मुद्देमाजी सैनिक असलेल्या तेज बहादूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होतावाराणसीमधील निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी गतवर्षी १ मे २०१९ रोजी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होतात्याविरोधात तेज बहादूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडीला आव्हान दिले होते.

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली आहे.माजी सैनिक असलेल्या तेज बहादूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्याविरोधात तेज बहादूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र अलाहाबाद हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, तेज बहादूर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यालायलाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत तेज बहादूर यांची याचिका फेटाळून लावली.

या प्रकरणी तेज बहादूर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले होते की, माझ्या अशिलाने आधी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले. हायकोर्टाने दिलेल्या निकालाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले होते की, माझ्या अशिलाचा उमेदवारी अर्ज हा अन्य कारणांमुळे रद्द करण्यात आला होता.वाराणसीमधील निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी गतवर्षी १ मे २०१९ रोजी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. तसेच नामांकन पत्रासोबत त्यांना भ्रष्टाचार किंवा सरकारसोबत विश्वासघात केल्यामुळे सशस्त्र दलांमधून बरखास्त करण्यात आले नसल्याचे प्रमाणपत्र संलग्न नसल्याचे अर्ज फेटाळताना सांगितले.तेज बहादूर यांना २०१७ मध्ये सीमा सुरक्षा दलांमधून बरखास्त करण्यात आले होते. सशस्त्र दलांच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप तेज बहादूर यांनी एक व्हिडिओ शेअर करून केला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीvaranasi-pcवाराणसीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय