नवी दिल्ली: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) व ‘आयआयटीं’सह अन्य राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘जेईई’ या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने लाखो प्रवेशेच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’ने दोन वेळा ठरलेल्या तारखा पुढे ढकलून परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.>लाखो उमेदवारांची नोंदणीपरीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशभरातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ साठी तर सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. निर्बंध पाळून परीक्षा घेता याव्यात यासाठी ‘एनटीए’ने परीक्षाकेंद्रांची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. शिवायी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आधी निडलेले परीक्षाकेंद्र ऐनवेळी बदलण्याची मुभाही उमेवारांना देण्यात आली आहे.>परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे...विद्यार्थी त्यांच्यासोबत हँड सॅनेटायझर, मास्क, पाण्याची बाटली, पेन आणि पेन्सिल घेऊन जाऊ शकतात.आधीसारखेच कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे दागिने, कानातले घातला येणार नाहीत.कोणताही ड्रेसकोड नसेल. त्यामुळे ड्रेसकोड नाही म्हणून कोणत्याही केंद्रावर विद्यार्थ्याला अडवता येणार नाही.आता जेईईची परीक्षा सलग सहा दिवस १२ सत्रांमध्ये होईल.६ सप्टेंबर रोजी असलेल्या एनडीएच्या परीक्षेला बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देण्यात अडचणी येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून २४ ते ३१ जुलैच्या काळात पुन्हा अर्ज मागवले होते. एनडीएच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना जेईईची परीक्षा सुरुवातीच्या टप्प्यात देता येणार आहे. त्यामुळे त्यांना एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे.जेईईच्या मुख्य परीक्षेसाठी ८.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.>कोर्ट काय म्हणाले : महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करियर टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही.एनईटीचे म्हणणे : कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून परीक्षा घेता येतील, याची खात्री करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘नीट’, ‘जेईई’ परीक्षा होणार ठरल्या वेळीच, तारखा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:57 AM