शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द

By admin | Updated: March 31, 2017 11:11 IST

67 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टातील जवळपास 15 न्यायाधीशांची उन्हाळ्यातील सुट्टीच रद्द करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - 67 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टातील जवळपास 15 न्यायाधीशांची उन्हाळ्यातील सुट्टीच रद्द  करण्यात आली आहे. घटनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकरणांवर सुनावणी व्हावी, याकरिता सरन्यायाधीश जे. एस. केहर यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रकरणांचा यात समावेश आहे. यावरील सुनावणी घटनापीठाकडे  होईल. या वेळी सर्व पक्षकारांची बाजू ऐकण्यात येईल, असे न्या. केहर यांनी स्पष्ट केले. 
 
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत न्यायाधीश या खटल्यांवर नियमित स्वरुपात काम करणार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांशी संबंधित असलेले प्रकरणं मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
आता 11 मेपासून या प्रकरणांची सुनावणी होईल. सरन्यायाधीश जे. एस. खेहर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यांत सरकारला उत्तर देण्याचे निर्देश गुरुवारी दिले. परंपरेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका भावनांशी जोडलेल्या असून पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या मुद्यावर विचार करणार, यासाठी विस्तृत सुनावणी आवश्यक आहे. 
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे 28 पैकी 15 न्यायाधीश आपली उन्हाळ्याची सुट्टी सुनावणी व निर्णय घेण्यात घालवणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच शनिवारी आणि रविवारीदेखील काम करण्याची तयारी न्यायाधीशांनी दर्शवली आहे.  तर दुसरीकडे, अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान खंडपीठ स्थापन करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.
 
यावर, "एकत्र काम करावं असं तुम्हाला वाटत नसेल तर सुट्टी मिळणार यासाठी मी खूप खूश होईन. पण नंतर खूप वर्ष गेले आणि खटल्यांवर सुनावणीही झाली नाही, असं  सांगू नका. उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान काम करायचं नाही तर यानंतर आम्हाला जबाबदार ठरवू नका", असे खडेबोल सरन्यायधीश केहर यांनी निर्णयाला विरोध करणा-यांना सुनावले आहे.