शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

‘संथारा’वरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठविली

By admin | Updated: September 1, 2015 02:38 IST

पूर्वापार चालत आलेल्या संथारा किंवा संलेखना (मृत्यूपर्यंत उपवास) या धार्मिक व्रताला बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : पूर्वापार चालत आलेल्या संथारा किंवा संलेखना (मृत्यूपर्यंत उपवास) या धार्मिक व्रताला बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती देत जैन समाजाला मोठा दिलासा दिला आहे. या व्रताला बेकायदेशीर ठरविण्यात आल्यानंतर जैन धर्मीयांनी देशभर आंदोलन चालवतानाच कायदेशीर लढ्याचा मार्ग अवलंबला होता.सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट करतानाच केंद्र आणि राजस्थान सरकारला नोटीस जारी केली आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय चार वर्षे स्थगित ठेवला जाऊ शकतो किंवा सुनावणीपर्यंत हे प्रकरण स्थगित राहील. अखिल भारत वर्षीय दिगंबर जैन परिषदेसह चार संघटना आणि दोन जैन धर्मीयांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने संथारा व्रताला आत्महत्या ठरवितानाच भादंवि कलम ३०६ आणि नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. २००६ मध्ये जयपूरच्या कैलादेवी हिरावत यांनी संथारा व्रत अवलंबत शरीर त्यागल्यानंतर या व्रताची चर्चा झाली.याचिकेतील युक्तिवाद जैन धर्माचे आधारभूत दर्शन आणि तत्त्वांचा विचार न करताच उच्च न्यायालयाने निर्णय दिल्याकडे विविध जैन संघटनांनी लक्ष वेधले होते. संथारा ही अत्यंत प्राचीन परंपरा असून या व्रताची तुलना आत्महत्येशी करता येत नाही. संसारातील मोह पूर्णपणे संपल्यानंतर संथारा व्रत अवलंबता येते. हे व्रत वृद्धावस्थेत स्वीकारले जाते तर आत्महत्या ही कोणत्याही क्षणी आवेगाच्या परिणामांतून घडत असते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला आपली श्रद्धा आणि मान्यतेनुसार जगण्याचा अधिकार आहे. संथारावर बंदी आणल्यास घटनेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन ठरेल. आधुनिकतेच्या नावाखाली जैन समाजावर काहीही थोपवता येणार नाही, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयांत दाखल याचिकांमधून करण्यात आला होता. कुटुंबाची सहमती आवश्यकऔरंगाबादचे सचिन झवेरी यांच्या याचिकेवर बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. संदीप देशमुख यांनी संथारा व्रत स्वीकारताना कुटुंबीय आणि नातेवाइकांची सहमती आवश्यक असल्याकडे लक्ष वेधत आत्महत्येशी नाते जोडता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. या मुद्यासह विविध पैलूंवर विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला. पुढील सुनावणीबाबत न्यायालयाने काहीही स्पष्ट केलेले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)