शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटाधारकांना सुप्रीम कोर्ट देणार दिलासा?

By admin | Updated: April 12, 2017 17:44 IST

जर तुमच्याकडे चलनातून रद्द करण्यात आलेल्या 1000 किंवा 500 रुपयांच्या नोटा असतील तर जुलै महिन्याअखेरपर्यंत सांभाळून ठेवा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - जर तुमच्याकडे चलनातून रद्द करण्यात आलेल्या 1000 किंवा 500 रुपयांच्या नोटा असतील तर जुलै महिन्याअखेरपर्यंत सांभाळून ठेवा. कारण, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर काही कारणास्तव रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकांमध्ये जमा करू न शकणा-या नागरिकांना सरकारकडून आणखी एक संधी देण्यात यावी अथवा नको, यावर सुप्रीम कोर्ट जुलै महिन्यात निर्णय देणार आहे. 
 
दरम्यान, काळा पैसा आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी ऐतिहासिक नोटाबंदी निर्णयाची घोषणा करत 30 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. सरकारने दिलेल्या कालावधीत विविध कारणांमुळे नोटा जमा करू न शकणा-या डझनहून अधिक नागरिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.  यावर केंद्र सरकारने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता एक साधं प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, अशी तक्रार याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली आहे.  
 
दरम्यान, मंगळवारी सुप्रीम कोर्टात संबंधित याचिकांच्या सुनावणीदरम्यान अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, नोटाबंदी अध्यादेशात नागरिकांना जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी संधी देण्यात यावे, अशी सक्ती नाही. उलट  चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा स्वतःजवळ ठेवणं गुन्हा असल्याचं अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. 
 
"त्यामुळे आता नोटा जमा करण्यासाठी दुसरी संधी दिली जाणार नाही", असेही रोहतगी यांनी सांगितले. केंद्रानं दाखल केलेल्या शपथपत्रात एका याचिकाकर्त्यानं 66.80 लाख रुपये असलेल्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मागणी केली आहे. या लाखो रुपयांच्या नोटा जमा न होण्याचं कारण म्हणजे त्यांचे बँक खातं केवायसीसोबत जोडले गेलेले नव्हते. 
 
तर दुसरीकडे, सरन्यायाधीश जे.एस.खेहर, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी जुन्या नोटांमुळे त्रास सहन करवा लागणा-या नागरिकांना दिलासा देण्यात थेट स्वारस्य दाखवले नाही. त्यांनी असे सांगितले की, याचिकाकर्त्यांना आणखी एक संधी द्यावी की देऊ नये?, यावर आम्ही निर्णय घेऊ.   "जर सुप्रीम कोर्टाने जुन्या नोटा जमा करण्यासाठी मर्यादित कालावधीची संधी पुन्हा देण्याचा निर्णय घेतला तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा जमा करण्याचे कोणाचे कारण योग्य होते आणि कोणाचे कारण अयोग्य याचा निर्णय सरकार घेईल," अशी माहिती रोहतगी यांनी दिली आहे.
त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांची नजर आहे.