शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:51 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे.

कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे आणि ममता बॅनर्जी पत्रकारांना सामोरे गेले आहेत. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, बॅलेट पेपरच्याच माध्यमातून निवडणुका घ्या, असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. मी ईव्हीएमची बाजू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन मांडली, परंतु त्यासंदर्भात कोणतीही पावलं उचलण्यात आली नाही. माझा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वासच उडाल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जवळपास दीड महिन्यांनी राज ठाकरे 'पॉलिटिकल पीच'वर उतरले होते. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं होतं. तब्बल 14 वर्षांनी ते दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं गेलं होतं.  मात्र या घडामोडींनंतर, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचंही बोललं जात होतं.

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी राज यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 8 जुलैला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपानंदेखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. मात्र 2014 नंतर त्यांचा सूर बदलला,' असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून आपल्याला शून्य अपेक्षा असल्याचंदेखील त्यांनी बोलून दाखवलं होतं. केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज म्हणाले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं होतं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जी