शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ची सुपरफास्ट कमाई, महिनाभरात नऊ कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 06:30 IST

तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सेवा सुरू होऊन अवघ्या दोन महिन्यांतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

मुंबई : तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सेवा सुरू होऊन अवघ्या दोन महिन्यांतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणारी तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसने नोव्हेंबरमध्ये ९.२ कोटी रुपये कमावले आहेत.

नोव्हेंबरमध्ये मुंबई ते गांधीनगर या ट्रेनने ४.४९ कोटी रुपये कमावले, तर गांधीनगर ते मुंबई या ट्रेनने केवळ तिकीट भाड्यांद्वारे ४.७२ कोटी रुपये कमावले आहेत. ऑक्टोबर महिन्यात तिकीट विक्रीतुन ८.२५ कोटी उत्पन्न मिळाले होते.  ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतला झेंडा दाखविला होता. या गाडीला प्रवाशांचा प्रचंड  प्रतिसाद मिळत असून, सरासरी १३० टक्के क्षमतेने गाडी धावत आहे, असे पश्चिम रेल्वेने सांगितले.

  • १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेनमध्ये ११२८ प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  गांधीनगर ते मुंबई या वंदे भारत एक्स्प्रेसचा एकेरी प्रवासाचा वेळ अंदाजे साडेपाच तासांचा आहे.  
  • मुंबई ते गांधीनगर एसी चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी १२७५ रुपये आणि गांधीनगर ते मुंबई प्रवासासाठी १४४० रुपये मोजावे लागतात. 

मुंबई ते अहमदाबाद इतर गाड्यांवर परिणाम नाहीवंदे भारतच्या लोकप्रियतेचा शताब्दी एक्स्प्रेससारख्या मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांवर परिणाम झाला नाही.  खरेतर, नवीन वंदे भारत ट्रेन या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागणीला पूरक आहे, तर शताब्दी एक्स्प्रेसदेखील सरासरी प्रवासी संख्येने धावत आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईahmedabadअहमदाबादVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस