संडे
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST
ावसायिक खूष मात्र प्रत्यक्षात सामसूमच. . .
संडे
सातपूर : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या नवीन कार्यकारिणीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, २७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.आयमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज घोषित केला असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, (दोन जागा), खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य १९ जागा अशा २५ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. १५ ते १८ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, २२ मे रोजी माघारीची अंतिम मुदत आणि २७ मे रोजी मतदान, २८ ला मतमोजणी आणि ३० मे रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून, त्याचवेळी निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र अहिरे यांनी दिली. (वार्ताहर)