ग्रामीण हॅलो पान 2 साठी सारांश प?ा
By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST
विजेच्या तारा ओढून दुरुस्त करण्याची मागणी
ग्रामीण हॅलो पान 2 साठी सारांश प?ा
विजेच्या तारा ओढून दुरुस्त करण्याची मागणीकंदलगाव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी 33 क़े व्ही़ उपकेंद्रांतर्गत असणार्या गावातील अनेक ठिकाणच्या खांबावरील विजेच्या तारा लोंबकळत आहेत़ त्यामुळे याचा शेतकरी व प्राण्यांना धोका निर्माण झाला आह़े तरी या तारा ओढून दुरुस्त कराव्यात, अशी मागणी शेतकर्यांनी केली आह़े कामती परिसरात अवकाळीने नुकसानकुरुल : मोहोळ तालुक्यातील कामती परिसरातील कुरुल, कोरवली, सोहाळे, वडवळ, इंचगाव, जामगाव, वटवटे, येणकी या गावात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल़े यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा या बागांसह कडब्याचे नुकसान झाल़ेअभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकुसळंब : येथील जि़ प़ शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, याबाबत मुख्याध्यापक किशोर बगाडे, अर्चना जाधव, मंगल शेळके यांनी मार्गदर्शन केल़े यावेळी प्रितेश बोकेफोडे, रोहन शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केल़े आभार अर्चना राऊत यांनी मानल़ेजिल्हाध्यक्षपदी आनंद गायकवाडसोलापूर : पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यपदी आनंद विष्णू गायकवाड यांची निवड करण्यात आली़ ही निवड प्रा़ निवृत्ती अरु, प्रदेश संघटक एऩ एम़ पवळे यांनी केली़ यावेळी आनंद स्वामी, विजय सुरवसे, राजगोपाल खांडेकर, हेमंत सर्वगोड आदी उपस्थित होत़ेजिल्हा संयोजकपदी यशवंत फडतरेसोलापूर : आम आदमी पार्टीच्या जिल्हा संयोजकपदी यशवंत फडतरे यांची निवड राज्य निरीक्षक मारुती भापकर यांनी केली़ यावेळी मानव कांबळे, सविता शिंदे, ललित बाबर, केदारीनाथ सुरवसे, रुद्राप्पा बिराजदार, प्राजक्ता चांदणे, रावसाहेब पवार उपस्थित होत़े