सारांश बातम्या
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
अचानक प्रकृती बिघडून मृत्यू
सारांश बातम्या
अचानक प्रकृती बिघडून मृत्यूनागपूर : घरी झोपला असताना अचानक प्रकृती बिघडल्याने एका २७ वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी २.२० वाजता घडली. गजानन वसंत सातपुते (२७) रा. दुबेनगर, मोरेश्वर खोटेकर यांच्या घरी किरायाने राहणारे दुपारी जेवण करून आपल्या घरी झोपले होते. अचानक त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.गच्चीवरून पडून मृत्यूनागपूर : घरासमोरील शाळेच्या नवीन बांधकामाच्या गच्चीवरून पडून २० वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ८.४५ वाजता घटली. महेश खुमाजी भुसारी (२०) रा. पार्वतीनगर, मांजरा हा आपल्या घरासमोरील शाळेच्या नवीन बांधकामाच्या गच्चीवरून पडला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भोवळ येऊन पडल्याने मृत्यूनागपूर : बेसमेंटमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय इसमाचा भोवळ येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. शैलेश माणिकराव निकोसे (३०) रा. मोठा इंदोरा, शिवमंदिर, धम्मकुटी बौद्धविहारामागे, जरीपटका हे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता बेसमेंटमध्ये पाणी आणण्यासाठी गेले. तेथे ते भोवळ येऊन खाली पडले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रेल्वेगाडीतून २९ हजाराचा मुद्देमाल लंपासनागपूर : समरसता एक्स्प्रेसमधील प्रवाशाची २७ हजाराच्या मुद्देमालाची बॅग पळविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रशांत दामोदर खारकर रा. पोथरू रोड, दिवेवाडी पुणे हे १२१५१ समरसता एक्स्प्रेसने (कोच एस-४, बर्थ १, ४) नाशिक ते अकोला असा प्रवास करीत होते. भुसावळ रेल्वेस्थानकावर आऊटरवर गाडी उभी असताना अज्ञात आरोपीने खिडकीतून हात टाकून त्यांची बॅग पळविली. त्यात आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल, चांदीचा हत्ती किंमत सात हजार, पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम असा एकूण २९ हजाराचा मुद्देमाल होता.