सारांश...
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
वृद्धेचा मृत्यू
सारांश...
वृद्धेचा मृत्यू नागपूर : नंदनवनमधील आनंद नगरात राहणाऱ्या सरला विनायकराव चौहाण (वय ७०) पायऱ्यावरून घसरून पडल्यामुळे मृत झाल्या. मनीष विनायक चौहाण (वय ४०) यांच्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.--- जरीपटक्यातील व्यक्तीचा मृत्यू नागपूर : जरीपटक्यातील सिध्दार्थ बालूराम सोनवाल (वय ४५) यांना शनिवारी दुपारी १ वाजता अचानक चक्कर आल्याने खाली पडले आणि त्यांचे निधन झाले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. ---