सारांश
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
नोकर भरतीवरील बंदी उठवा
सारांश
नोकर भरतीवरील बंदी उठवामुंबई : राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगारांच्या हितासाठी नोकर भरतीवरील बंदी उठविण्यात यावी असा महत्त्वपूर्ण ठराव नुकताच बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या विशेष आढावा बैठकीत मंजूर करण्यात आला. याविषयी लवकरच महासंघाचे पदाधिकारी जिल्हास्तरीय संपर्क दौरे करणार असून त्यानंतर कर्मचारी व सुशिक्षित बेरोजगारांचे संयुक्त मेळावे, प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील, असे एस.आर.भोसले यांनी जाहीर केले.५६ आदर्श गावांचा समूह विकसित करणारमुंबई : आदर्श गाव विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ५६ गावांसाठी समग्र विकास व वृद्धी योजना हाती घेतला आहे. हा कार्यक्रम ५६ गावांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. तसेच राबविलेल्या विकास प्रकल्पांचे परिणाम व निष्पत्तीचे विश्लेषण करण्यासाठी वास्तविक कालावधीत निरीक्षण, मध्यावधी व अंतिम सामाजिक -आर्थिक मूल्यमापून केले जाणार आहे. हा उपक्रम नेबर ऑफ च्यॉईस अंतर्गत टाटा पॉवरने हाती घेतला आहे.एमर्जन्सी टॉकटाईम सेवामुंबई : टाटा टेलिसेर्व्हीसेसचा संघटीत ब्रँड टाटा डोकोमो मुंबई ग्राहकांसाठी नवीन प्रकारची वेगळी एमर्जन्सी टॉकटाईम सेवा सुरु करीत आहे. क्रेडीट टॉकटाईमची मजा घेत आपल्या व्यक्तींशी कनेक्टेड राहण्यासाठी ग्राहकांना ही सेवा सहकार्य करेल. ही टोल फ्री सुविधा असून दिलेली क्रेडीट रक्कम अगदी नगण्य शुल्क आकारुन नंतरच्या २४ तासात वसूल केली जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या वेळी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरु करण्यात आली आहे.कचर्याने घाणीचे साम्राज्यमुंबई : लोअर परळ येथील बाजारपेठेत भाजीविक्रेत्यांकडून कचर्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने कचर्याचे ढीग साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून सर्वत्र अस्वच्छता होत आहे. शिवाय, ऐन पावसाळ्यात दिवसेंदिवस कचरा साठून राहिल्याने रोगराईही पसरली आहे.उद्योगाचे मार्गदर्शनमुंबई : कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे पर्यटन उद्योगविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २१ जून रोजी स. ९.०० ते साय. ६.०० वाजेपर्यंत कोकण भुमी प्रतिष्ठान कार्यालयय क्र. १२/८ अ, कोहिनूर मिल कंपाऊंड, महात्मा ज्योतिबा फुले रोड, नायगांव, दादर (पू.) येथे पार पडेल.करिअर मार्गदर्शन वर्ग मुंबई : इंडियन करिअर गायडन्स सेंटरतर्फे मुंबई, ठाणे, नवी मुंबई व उपनगरांमध्ये डी.एड. नेट-सेट व पीएचडी प्रवेश परिक्षा २०१५ .याविषयी मोफत मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. शनिवार व रविवार या दिवशी हे वर्ग घेण्यात येतील.