सारांश
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
विद्यार्थी वसतिगृहाची दुरवस्था
सारांश
विद्यार्थी वसतिगृहाची दुरवस्थानागपूर : नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांची दयनिय अवस्था झाली आहे. या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लगतो. अनेक वसतिगृहांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छ बाथरुम व शौचालय उपलब्ध नाही. या सर्व वसतिगृहांमध्ये या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. सौरभ दुबे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले. यावेळी रूपेंद्र नागपुरे, समीर शेख, करण उमरेडकर, निखील कांबळे, शैलेंद्र तिवारी, अमोल हिरापुरे आदी उपस्थित होते. एसएनडीएलची फ्रेंचाईसी रद्द करण्याची मागणीनागपूर : ग्राहकांचे हित लक्षात घेता महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स विभागातील एसएनडीएल कंपनीची फे्रंचाईसी रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस एन. बी. जारोंडे यांनी ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. एसएनडीएलच्या निकृष्ट सेवेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे ही फ्रेंचाईसी ताबडतोब रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केबल टाकणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणीनागपूर : शहरात सध्या ४ जी सुविधेसाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. न्यू अमरनगरातील गणेश अपार्टमेंटपुढे खड्डा खोदताना महापालिकेची गडरलाईन फुटली आहे. त्यामुळे गडरमधील पाणी विहिरीत झिरपत आहे. येथील नागरिक रोज या विहिरीतील पाणी वापरतात. मात्र, आता त्यांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे केबल टाकणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. बीएसएनएल ट्रेनिंग संस्थेचा वर्धापन दिननागपूर : बीएसएनएल ट्रेनिंग संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगा आणि मेडिटेशनवर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे मुख्याध्यापक शुक्ला यांनी योग प्रशिक्षक सचिन माथुरकर व गुणशेखरन यांचा रोपटे देऊन सत्कार केला. सुख-शांती-समाधान संस्थेच्या सचिव शीला केळापुरे यांनी प्रास्ताविक केले. अष्टांग योगाची माहिती नमिता बांगरे यांनी दिली. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. सुपेकर यांनी आभार मानले.