सारांश...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2015 23:44 IST
कंत्राटदार संघातर्फे वृक्षारोपण
सारांश...
कंत्राटदार संघातर्फे वृक्षारोपणनागपूर : महापालिके तील कंत्राटदार संघातर्फे स्वातंत्र्य दिनी मनपा मुख्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, मंगळवारी झोनचे सभापती राजू थूल, उपायुक्त आर.झेड.सिद्दीकी, उपायुक्त संजय काकडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी,संघाचे अध्यक्ष विजय नायडू व सदस्य उपस्थित होते. ...कुंभमेळ्यासाठी अग्निशमनचे पथक जाणारनागपूर : नाशिक येथील कुंभमेळयाच्या व्यवस्थेसाठी मनपाच्या अग्निशमन विभागाचे पथक जाणार आहे. विभागाचे स्थानाधिकारी एस.के.काळे व स्थानक प्रमुख मोहन गुडधे यांच्या नेतृत्वात २७ ऑगस्टला हे पथक रवाना होणार आहे. महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पथकाची पाहणी केली. त्यांना नियोजित कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या....समाजकल्याण विभागातर्फे वृक्षारोपणनागपूर : महापालिक ा यंदाचे वर्ष पर्यावरण वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या निमित्ताने मनपाच्या समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. सभापती रश्मी फडणवीस, माजी उपमहापौर जैतुनबी अन्सारी, सभापती साधना बरडे, जयश्री वाडीभस्मे, नीता ठाकरे, प्रभाताई जगनाडे, सुधा इरस्कर आदी उपस्थित होत्या.