शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 18:20 IST

शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे?

चंदीगडनव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बैठकांचं सत्र सुरू असूनही अद्याप काही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी खेळाडूंनीही पाठिंबा दिला आहे. शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला, असा सवाल सुखबीरसिंग बादल यांनी उपस्थित केला आहे. 

"शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे? शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा अधिकार कुणी दिला?", असं सुखबीरसिंग बादल म्हणाले. 

प्रकाशसिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार केला परतशेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने प्रकाशसिंह बादल यांना मोदी सरकारने दिलेला पद्म विभूषण पुरस्कार परत करण्याबाबतचं पत्र राष्ट्रपतींना लिहीलं आहे. "प्रकाशसिंह बादल यांनी आपलं पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व्यतित केलं आहे. त्यामुळे सरकारला एक खणखणीत चपकार देण्यासाठी त्यांनी आपला पुरस्कार परत केला आहे. जर शेतकऱ्यांनाच हा नवा कायदा गरजेचा वाटत नसताना सरकार तो लादण्याचा का प्रयत्न करतंय?", असं सुखबीरसिंह बादल म्हणाले. 

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्यहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांचा समावेश असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात हिंसक वळण देण्यासाठी काही खलिस्तानी देखील यात सामील झाले आहेत, असा दावा खट्टर यांनी केला होता. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपा