शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sukesh Chandrashekhar : "बेबी, तुझ्यासारखं सुंदर या ग्रहावर दुसरं कोणीच नाही"; जेलमधून सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 12:47 IST

Sukesh Chandrasekhar And Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

तिहार जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrashekhar) आणखी एक पत्र आता समोर आले आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला ( Jacqueline Fernandez) पत्र लिहून ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात सुकेशने "माय बेबी, माय बोम्मा, जॅकलिन, बेबी, मी तुला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा देतो! हा तुझ्या आवडत्या सणांपैकी एक सण आहे आणि तुला खूप खूप प्रेम" असं म्हटलं आहे. सध्या या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. 

सुकेशने तुरुंगातून एक पत्र लिहिले आहे त्यामध्ये, "बेबी, मी तुला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा देतो! हा तुझ्या वर्षातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे. मला तुझी आठवण येते. मी तुझ्यातला तो बालिशपणा खूप मिस करत आहे. कशी तू अंडी फोडतेस आणि आतून कँडीज बाहेर काढतेस. बेबी, तू किती सुंदर आहेस याची तुला कल्पना आहे का? तुझ्यासारखे सुंदर या ग्रहावर दुसरं कोणीच नाही. माय बनी रॅबिट, मी तुझ्यावर प्रेम करतो" असं म्हटलं आहे. 

"बेबी ही फेज संपणार आहे आणि आता ते चांगले होईल हे प्रत्येकजण पाहणार आहे. बेबी असा एकही क्षण नाही जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करत नाही आणि मला माहीत आहे की तुझ्या बाबतीतही असेच आहे. माय हनी बी तुझ्या सर्वात सुंदर हृदयात काय आहे हे मला माहीत आहे. मी वचन देतो की पुढचा ईस्टर तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम ईस्टर असेल. बेबी काल मी आपल्याबद्दल विचार करत होतो जेव्हा मी लक्स कोझीची तुझी नवीन जाहिरात पाहिली. ही जाहिरात निव्वळ योगायोग आहे, पण तू खूप सुंदर आहेस बेबी" असंही सांगितलं. 

'तू माझ्या हृदयाची धडधड आहेस'

सुकेश चंद्रशेखरने यापुढे एका गाण्याच्या ओळींचा उल्लेख केला. सुकेशने , 'तुम मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिए' लिहिले आहे. पुढे सुकेश म्हणाला, "बेबी तू माझ्या हृदयाची धडधड आहेस. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. बेबी, आई, वडील आणि कुटुंबाला पुन्हा एकदा ईस्टरच्या शुभेच्छा. देव आशीर्वाद देवो! बेबी माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझा जॅकी बोम्मा."

वाढदिवसाला लिहिलं होतं पत्र

विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पत्र लिहिलं होतं. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते - "माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा, आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिस