शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सुकेश चंद्रशेखरमुळे आता बॉलिवूड ईडीच्या रडारवर; शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरचे नाव समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:18 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये विविध तपास यंत्रणांनी बॉलिवूडचे काही अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये विविध तपास यंत्रणांनी बॉलिवूडचे काही अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी केली होती. त्यात प्रामुख्याने अमली पदार्थांशी संबंध होता. मात्र, आता बॉलिवूड अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे. आता सुमारे २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांची नावे समाोर आली आहेत. सुकेशकडून त्यांनी अतिशय महागडे गिफ्ट घेतले असून अशा १५ अभिनेत्रींवर ईडीची नजर आहे. याशिवाय श्रद्धा कपूरचेही नाव सुकेशने घेतले आहे. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणात एनसीबीने अमली पदार्थांच्या चौकशीसाठी तिला बोलाविले हाेते. तिला याप्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत केली हाेती, असे सुकेशने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. 

सुकेशने नोरा फतेहीला एक आलिशान बीएमडब्ल्यू कार, आयफोन आणि एक कोटी रुपये दिल्याचे ईडीला आढळले आहे. दोघांचे चॅटही समोर आले होते. ती खूप आवडत असल्याने तिला महागडे गिफ्ट दिल्याचे सुकेशने तिला सांगितले होते. नोरा फतेहीला ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले होते.

जॅकलीनची विचारपूस

-काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हीची ईडीने कसून चौकशी केली होती. 

- सुकेश चंद्रशेखरने तिला अतिशय महागडे गिफ्ट दिले होते. आता त्याने शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, नोरा फतेही या अभिनेत्रींसह हरमन बावेज या अभिनेत्याचेही नाव घेतले आहे. 

- चौकशीदरम्यान सुकेशने शिल्पा शेट्टीचा उल्लेख केला. तिचा पती राज कुंद्रा पाॅर्नाेग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर सुकेशने तिला संपर्क केला हाेता. 

- शिल्पा ही त्याची मैत्रिण असून जामिनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसShilpa Shettyशिल्पा शेट्टीShraddha Kapoorश्रद्धा कपूर