शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Sukesh Chandrasekhar : महाठग सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक लेटर बॉम्ब; "जॅकलिन म्हणाली होती, I Love You"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:01 IST

Sukesh Chandrasekhar And Jacquline Fernandez : जेव्हा जेव्हा सुकेशचा उल्लेख होतो तेव्हा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चर्चा रंगते.

महाठग सुकेश चंद्रशेखर दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये बंद आहे. मात्र तुरुंगात असतानाही तो नेहमीच चर्चेत राहतो. जेव्हा जेव्हा सुकेशचा उल्लेख होतो तेव्हा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चर्चा रंगते. तो तिला लव्हलेटर लिहितो ज्यामुळे ती देखील चर्चेत येते. सुकेशच्या वाईट कृत्यांमध्ये जॅकलीनचा सहभाग असल्याचा आरोप जॅकलिनवर करण्यात आला, तेव्हा तिने स्पष्ट केलं की तिला सरकारी अधिकारी असल्याचे माहीत होते. तो फसवणूक करत असल्याचं माहीत नव्हतं. 

सुकेशने आता जॅकलिनच्या नावाने आणखी एक पत्र लिहिलं आहे. पत्रात सुकेशने जॅकलिनला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पत्रात त्याने जॅकलीनसोबत केलेल्या चॅटही शेअर केलं आणि चॅट 2021 मधील असल्याचे सांगितलं. यामध्ये जॅकलिन सुकेशची माफी मागतेय. 

चॅटचा संदर्भ देत सुकेश लिहितो की, तिने आय लव्ह यू असे मेसेजही पाठवले होते. अलीकडेच जॅकलीनने सुकेशच्या पत्रांमुळे तिला त्रास झाल्याची तक्रारही दिल्ली पोलिसांकडे केली होती. एवढेच नाही तर सुकेशपासून आपल्याला धोका असल्याचं तिने दिल्ली पोलिसांना तसेच न्यायालयाला सांगितलं आहे.

सुकेशच्या वकिलाने दावा केला आहे की चॅट इतर कोणाशीही नसून त्याचा क्लायंट आणि जॅकलिन यांच्यात आहे. एकीकडे ती सॉरी म्हणतेय तर दुसरीकडे आय लव्ह यू म्हणतेय. वकिलाचे म्हणणे आहे की, हे चॅट 2021 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरण उघडकीस आल्यापासूनचे आहेत. नुकतीच आणखी एक चॅट व्हायरल झालं होतं ज्यात जॅकलिनने सुकेशवर गंभीर आरोप करत त्याने तिला कसं अडकवलं होतं ते सांगितलं. 

जेव्हा जॅकलीनने दिल्ली पोलीस आणि कोर्टात केलेल्या तक्रारीत सुकेशपासून तिच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं तेव्हा दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. जॅकलिनच्या आरोपांवर सुकेशने असंही सांगितलं की, तो तिची सर्व रहस्य उघड करणार आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे असे पुरावे आहेत जे जॅकलिनचं सत्य बाहेर आणतील. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिस