नाशिक : विषारी औषध प्राशन करून सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याने आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़ संभाजी ज्ञानदेव उशिरे (वय ७४ रा. पोलीस मुख्यालय) असे आत्महत्त्या केलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचे नाव असून, आजारपणास कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उशिरे यांनी रविवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले़ दरम्यान, ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याची आत्महत्त्या
By admin | Updated: September 20, 2016 00:14 IST