शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देशात दर तीन सेकंदांना एक आत्महत्या; मानसिक आरोग्य कायद्याची अंमलबजावणी शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:17 IST

देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. १५ ते २९ वयोगटातील युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात खूप मोठे आहे. २०२० सालापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के जनता ही कोणत्या ना कोणत्या मानसिक विकारांनी ग्रस्त असेल.

नवी दिल्ली : देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. १५ ते २९ वयोगटातील युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात खूप मोठे आहे. २०२० सालापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के जनता ही कोणत्या ना कोणत्या मानसिक विकारांनी ग्रस्त असेल. या परिस्थितीत मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाला प्राथमिक उपचार मिळण्याची सोय सरकारने करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य कायदा २०१७ची अमलबजावणी शनिवारी, ७ जुलैपासून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशात १० कोटीहून अधिक मानसिक रुग्णजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारतातील १३५ कोटी लोकसंख्येपैकी ७.५ टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. त्यातील काहींच्या विकाराचे स्वरुप सामान्य तसेच अतिशय गंभीरही आहे. जगातील १९५ देशांपैकी भारतासह असे फक्त १३ देश आहेत ज्यामध्ये मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या प्रत्येकी १० कोटींच्या वर आहे. भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण असूनही त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फक्त ३८०० मानसोपचार तज्ज्ञ, ८९८ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ८५० सायक्रिअ‍ॅटिक सोशल वर्कर, १५०० सायक्रिअ‍ॅटिक नर्सेस, ४३ मनोरुग्ण रुग्णालये इतकीच संसाधने उपलब्ध आहेत.देशातील सर्व मानसिक रुग्णालयांमध्ये फक्त २० हजार खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वच मानसिक विकारग्रस्तांना योग्य उपचार मिळतात असे होत नाही. किंवा काहींना उपचारच मिळत नाहीत.खूप कमी रुग्णांना मिळतात उपचारमानसिक विकारग्रस्त रुग्णांची एकुण संख्येच्या मानाने खूप कमी रुग्णांवर उपचार होतात. त्यामुळे प्रत्येक मानसिक विकारग्रस्ताला प्राथमिक उपचार मिळण्याची सोय सरकारने करावी अशी मागणी मानसोपचार तज्ज्ञांनी केली आहे. देशात मानसोपचाराच्या व्यापक सुविधा सरकारी व खासगी क्षेत्रात उभ्या राहाव्यात व त्यावर योग्य नियंत्रण असावे यासाठी हा मानसिक आरोग्य कायदा २०१७ बनविण्यात आला आहे. त्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे असे मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या