लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : बेळगाव आणि बागलकोटसह उत्तर कर्नाटकातऊस दरासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आज आठव्या दिवशीही सुरूच आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मदतीसाठी केंद्र सरकारचा दरवाजा खटखटावला असून आज सायंकाळी बेळगावमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बेळगावजवळील हत्तरगी टोलनाक्यावर संतप्त शेतकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग थेट राजधानी बेंगळुरूपर्यंत पोहोचली आहे. प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर कारखानदारांनी देऊ केलेला ३,२०० रुपयांचा दर त्यांनी धुडकावून लावला आहे. या संघर्षामुळे राज्यातील तब्बल २६ साखर कारखान्यांचे गाळप पूर्णपणे ठप्प झाले आहे. शुक्रवारी होणारा राष्ट्रीय महामार्ग रोको तात्पुरता मागे घेण्यात आला असल्याची घोषणा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली होती. तरीही अनेक आंदोलक शेतकरी महामार्ग रोखण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दगडफेकीला सुरुवात केली.
रस्तायावर थांबविलेल्या गाड्यांवरही या शेतकऱ्यांनी दगडफेक केली. पोलिसांना या आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना आवरण्यासाठी धरपकड सुरु केली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
केंद्राकडे मुख्यमंत्र्यांचा रोख...
सिद्धरामय्या यांनी या आंदोलनावरून केंद्रावर टीका केली आहे. “एफआरपी दर निश्चित करणे आणि साखर निर्यात थांबविण्याचे अधिकार केंद्राकडे आहेत. केंद्राच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.”, असे ते म्हणाले आहेत.
Web Summary : Farmers' sugarcane price protest in Belgaum turned violent. Protesters demanding higher prices clashed with police at Hattargi toll plaza, pelting stones. The Chief Minister criticized the central government's policies regarding FRP and sugar exports, blaming them for farmer losses. Talks are ongoing to resolve the issue.
Web Summary : बेलगाम में गन्ने के दाम को लेकर किसानों का विरोध हिंसक हुआ। प्रदर्शनकारियों ने हत्तरगी टोल प्लाजा पर पुलिस पर पथराव किया। मुख्यमंत्री ने केंद्र सरकार की नीतियों की आलोचना करते हुए किसानों के नुकसान के लिए उन्हें जिम्मेदार ठहराया। मामले को सुलझाने के लिए बातचीत जारी है।