युवतीस पळवून नेल्याच्या संशयावरुन मारहाण
By admin | Updated: February 23, 2016 02:01 IST
जळगाव : युवतीस पळवून नेल्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण झाल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीस पळवून नेल्याच्या संशयावरुन मारहाण
जळगाव : युवतीस पळवून नेल्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण झाल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामेश्वर नगरातील रहिवाशी गणेश उर्फ तुषार फुलचंद यादव याने युवतीस प्रेमसंबंधातून पळवून नेल्याच्या संशयावरुन स्वप्नील उर्फ चपारा प्रकाश पिंपरकर, बाल्या सपकाळे, मनोज सपकाळे, चंद्रशेखर सपकाळे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांनी २१रोजी मध्यरात्री घरी येवून लाकडी दांडा व स्टीलच्या रॉडने गणेश व त्याचा भाऊ केतन यांना मारहाण करुन जखमी केले. याबाबत एमआयडीसी पोलीसात गणेश याच्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार श्रीराम बोरसे करीत आहे.रिक्षा उलटून दोघे जखमीजळगाव : शहरातील नाथवाडा परीसरात रिक्षा उलटल्याने गजानन पांडूरंग जाधव (३५) व महेंद्र उत्तम सूर्यवंशी (२१, दोघे रा. नाथवाडा) जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रात्री १०:४५ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गजानन यांच्या पायाला फ्रॅर असून महेंद्र किरकोळ जखमी आहे.वृद्धास माकडाचा चावाजळगाव : खंडेराव नगर भागात रामलाल ओंकार भोई (५२) यांना सायंकाळी माकडाने चावा घेऊन जखमी केले. त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले.