शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अशी विधाने उच्चपदाला शोभत नाहीत... भाजपाची अन्सारींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:10 IST

आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती अशा शब्दांमध्ये भाजपाचे सरचिटणिस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे.

ठळक मुद्दे आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत.- नायडूते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत.- विजयवर्गिय

नवी दिल्ली, दि.10- मावळते उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी निवृत्त होताना शेवटच्या मुलाखतीत केलेल्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात मुस्लीम समुदायात असुरक्षिततेची भावना असल्याचे विधान त्यांनी काल केले होते. त्यावर भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतीपदावरच्या व्यक्तीने असे विधान करणे त्यांच्या पदाला शोभा देत नाहीत अशी टीका केली आहे. इतकेच नव्हे तर हमिद अन्सारी आता पदावरुन मुक्त झाल्यावर पुन्हा राजकीय आश्रय शोधत आहेत त्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचीही टीका विजयवर्गिय यांनी केली.

अन्सारी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विजयवर्गिय म्हणाले, 'मी अशा विधानाचा निषेध करतो. आता निवृत्त होत असल्यामुळेच अन्सारी यांनी असे विधान केले आहे. ते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत. आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती.'

'नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखिल अन्सारी यांच्या विधानाचा त्यांचे नाव न घेता समाचार घेतला. 'काही लोक भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचे सांगत आहेत, मात्र संपुर्ण जगाशी तुलना केली तर भारतामध्ये ते अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते.' भारतामध्ये सहनशिलता लोप पावत असल्याच्या टीकेलाही त्यांनी भारतीय समाज सर्वात जास्त सहनशिल असल्याचे सांगत सहनशिलतेमुळेच भारतात लोकशाही यशस्वी झाल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. जर तर तुम्ही एखाद्या समुदायाला वेगळे काढून विचार करायला लागलात की इतर समुदाय त्याचा चुकीचा अर्थ काढतील. म्हणून तर सर्व समुदाय एकसमान आहेत, सर्वांना समान न्या आणि कोणाचेही लांगूलचालन होणार नाही असे आम्ही म्हणतो. आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत. भारतामध्ये सर्वधर्मसमभाव सर्व लोकांच्या मनात आणि रक्तातच आहे. भारत धर्मनिरपेक्ष राजकीय व्यक्तींमुळे नाही तर लोक आणि इथल्या संस्कृतीमुळे आहे. अशा शब्दांमध्ये नायडू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नायडू यांनी जरी अन्सारी यांचे नाव घेतले नसले तरी हे मत त्यांच्या विधानाला उत्तर समजले जाऊ शकते.