शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

"जीसॅट-9" चं यशस्वी उड्डाण, उपग्रह प्रक्षेपणात भारताचे पुढचं पाऊल

By admin | Updated: May 5, 2017 17:36 IST

दक्षिण आशियाई उपग्रह "जीसॅट-9" या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचे उड्डाण भरले आहे. उपग्रह प्रक्षेपणात भारताचे हे पुढचं पाऊल आहे.

 ऑनलाइन लोकमत

श्रीहरीकोटा, दि. 5 -  "जीसॅट-9" या दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रहाचे उड्डाण भरले आहे. उपग्रह प्रक्षेपणात भारताचे हे पुढचं पाऊल आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो)या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आले. या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे 100 किलोमीटरवरील श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी आकाशात सोडण्यात आले.
 
सार्क देशांच्या आठपैकी भारतासह सात देश या प्रकल्पाचे सदस्य आहेत. पाकिस्तानने ‘आमचा स्वत:चा अवकाश कार्यक्रम’ असल्याचे सांगून या प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे सार्कऐवजी "दक्षिण आशियाई उपग्रह" असे या उपग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे. 
 
या उपग्रहामुळे दक्षिण आशियायी देशांच्या परस्परांतील संपर्काला उत्तेजन मिळेल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी गुरुवारी सांगितले होते. 
 
इस्रोचा अग्निबाण जीएसएलव्ही-एफ09 ने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याला 235 कोटी रुपये खर्च आला असून, तो शेजारच्या देशांना 12 केयू बँड ट्रान्सपाँडर्समार्फत सेवा देईल.  या उपग्रहाचे आयुष्य 12 वर्षांचे आहे. या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत आणि परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल. याशिवाय देशांना संकटकाळी एकमेकांना माहिती पाठवण्यास मदत करील, असे कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
 
मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावर त्यांनी इस्रोला सार्क उपग्रह विकसित करण्यास सांगितले होते. या उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये नेपाळमधल्या 18 व्या सार्क परिषदमध्ये मांडली होती. 
 
हा उपग्रह भारताकडून शेजारच्या देशांना भेट दिला जाऊ शकेल, असा त्यांचा विचार होता. 30 एप्रिल रोजी मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात दक्षिण आशिया उपग्रह हा शेजारच्या देशांना भारताकडून अमूल्य भेट असेल, असे जाहीर केले होते.
 
उपग्रहाची आणि प्रक्षेपणाची वैशिष्ट्ये
 
उपग्रहाचे वजन २२३० किलो
 
उपग्रहाचा कार्यकाल १२ वर्षांपेक्षा जास्त
 
GSLV या प्रक्षेपकाद्वारे - रॉकेटेद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण  
 
GSLV मध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन  
 
स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केलेले GSLV चे सलग चौथे यशस्वी उड्डाण 
 
आत्तापर्यंत GSLV प्रक्षेपकाची 10 पैकी 5 उड्डाण अयशस्वी ठरल्यानं GSLV ला नॉटी बॉय ( naughty boy ) म्हणूनही ओळख