नवी दिल्ली : अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशासाठी कठोर परिश्रम करत राहणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोम, पॅरालिम्पिक स्टार अवनी लेखरा आणि सुहास यतीराज यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात दिला.
दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन असलेली नेमबाज लेखारा म्हणाली, “लोक म्हणतात की यश हे अपयशाचा समानार्थी आहे; पण मला वाटतं की अपयश हा यशाचा सर्वात मोठा भाग आहे. अपयशाशिवाय यश कधीच मिळू शकत नाही.”
तुमच्या समोर कोण आहे हे विसरा
पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता बॅडमिंटन स्टार आणि आयएएस अधिकारी सुहास म्हणाले, “चांगल्या गोष्टी सहज मिळत नाहीत. तुमचे मन हे तुमचे सर्वात मोठे मित्र आणि शत्रूही आहे. पराभवाच्या भीतीवर मात केल्यानंतर मी फक्त तो सामनाच नाही तर आणखी सहा सामने जिंकले.
लक्षात घ्या पराभवाच्या भीतीवर मात करा. तुमच्या समोर कोण आहे, याचा विचार करू नका.
‘शॉर्टकट नाही’
मेरी कोम म्हणाली, “बॉक्सिंग हा महिलांचा खेळ नाही. मी हे आव्हान स्वीकारले, कारण मला स्वतःला सिद्ध करायचे होते. देशातील सर्व महिलांना सांगायचे होते की आपण ते करू शकतो. जिद्दीतूनच मी अनेक वेळा विश्वविजेती झाले.
मुलांनो, हे लक्षात ठेवा
यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. अपयश हा यशाचा समानार्थी आहे.
तुमचे विचार तुमचे भविष्य ठरवतात. पराभवावर भीतीवर मात करा
स्पर्धा नेहमी स्वत:शी ठेवा. लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्वासनाचा व्यायाम करा.
खेळ किंवा अभ्यास, यात ब्रेक हवाच. कोणत्याही आव्हानाला समोरे जाण्यापूर्वी स्वत:शी लढा.
चांगल्या गोष्टी सहजपणे मिळत नाहीत. दुप्पट मेहनत करा.
झोप अतिशय गरजेची आहे. मानसिक फिट रहाल तरच फिजिकली फिट.