शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचे कामकाज सलग सहाव्या दिवशीही तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:47 IST

प्रादेशिक पक्षांनी विविध मुद्द्यांवरुन लोकसभेत सलग सहाव्या दिवशी म्हणजे सोमवारीही गदारोळ सुरुच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.

नवी दिल्ली : प्रादेशिक पक्षांनी विविध मुद्द्यांवरुन लोकसभेत सलग सहाव्या दिवशी म्हणजे सोमवारीही गदारोळ सुरुच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ५ मार्च रोजी झाला. त्या दिवसापासून सभागृहात गदारोळामुळे काहीही कामकाज होऊ शकलेले नाही.लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर तेलुगू देसम पक्ष, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षांचे खासदार हातात फलक घेऊन अध्यक्षांसमोरील जागेत जमून जोरदार घोषणाबाजी सुरू करीत होते. या फलकांवर त्यांच्या मागण्या लिहिलेल्या होत्या. खासदारांच्या या गदारोळामुळे सभागृहाचे पार पडणे अशक्य होत होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जासाठी तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस आग्रही आहेत, तर आपल्या राज्यातील अन्य प्रश्नांसाठी अण्णा द्रमुक तसेच तेलंगणा राष्ट्र समितीचे सदस्यही घोषणाबाजी करीत आहेत. त्यामुळे कामकाज चालवणे अध्यक्षांनाही अवघड झाले आहे. परिणामी जवळपास आठवडाभर लोकसभेत काहीही कामकाज झालेले नाही.लोकसभेत आज, सोमवारीही प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी पहिल्यांदा लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला दोन विधेयके मांडत असतानाच सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला.>विधेयकामुळे हक्कांवर गदाफरारी आर्थिक गुन्हेगारांबाबतच्या विधेयकाला बिजू जनता दलचे खासदार भ्रतृहरी महताब यांनी विरोध केला. या विधेयकातील तरतुदी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाºया आहेत असा आहेत असा आक्षेप घेतला. निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत आरोप सिद्ध होण्याआधीच एखाद्या व्यक्तीस गुन्हेगार मानण्याची तरतूद त्यात आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला. आरोप सिद्ध होण्याआधीच त्याची मालमत्ता जप्त करण्याची या विधेयकातील तरतुद योग्य नाही असेही महताब म्हणाले. फरारी आर्थिक गुन्हेगारांबाबतच्या विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर वित्त राज्यमंत्री शुक्ला म्हणाले की, या विधेयकातील तरतुदींवर सभागृहात चर्चा व्हायला हवी. मात्र गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करणे अध्यक्षांना भाग पडले.

टॅग्स :lok sabhaलोकसभा