शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

सबसिडी तर्कर्संगत

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

सबसिडी तर्कसंगत असायला हवी

सबसिडी तर्कसंगत असायला हवी
देशाच्या परकीय गुंतवणुकीत ३९ टक्के वाढ : पंतप्रधान
नवी दिल्ली : कॉपार्ेरेट्सना विविध सवलती दिल्याने देशाचे ६२ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याविषयी कोणीही बोलत नाही. मात्र हाच वर्ग गरिबांना मिळणारी सबसिडी बंद करण्यात यावी, अशी भूमिका घेतात, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना खडे बोल सुनावले. ग्लोबल बिझनेस समिटच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी गरिबांना दिल्या जाणार्‍या सबसिडीचे समर्थनही केले.
माझे सरकार सबसिडीच्या विरोधात नाही, मात्र ती तर्कसंगत असायला हवी, असे सांगताना ते म्हणाले की अन्य क्षेत्रातील सबसिडी कमी व्हावी आणि त्यातून कृषी उत्पादनवाढीस प्रोत्साहन मिळावे, अशी आपली इच्छा आहे. आपण त्या दिवसाची वाट पाहत आहोत. आपण सबसिडीच्या दुरूपयोगाच्या विरोधात आहोत. दुरूपयोग टाळण्यासाठीच एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी थेट बँकेच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत देशातील ५६ लाख लोकांनी घरगुती गॅस सबसिडी सोडली आहे. त्यामुळे जो पैसा वाचला आहे, त्यातून ५0 लाख गरिबांना गॅस सबसिडी देण्यात आली आहे. चंदीगड हे ३१ मार्चपर्यंत देशातील पहिले सबसिडीमुक्त शहर बनलेले असेल.
आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय अडचणीत होती. मात्र १९ महिन्यांमध्ये आम्ही या देशाला गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र बनवून दाखवले. पण तेवढ्यावर आमचे सरकार खुश नाही. अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. गुंतवणूक आणखी वाढायला हवी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी अप्रासंगिक कायदे रद्द करून नवे कायदे करण्याची गरज आहे. असे १८३७ कायदे जुनाट असल्याचे आम्ही शोधून काढले आहे. त्यातील १२५ रद्द केले असून, आणखी ७५८ कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात वरिष्ठ सभागृहात अडचणी येत आहेत.
जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडली आहे. तरीही गेल्या चार तिमाहींमध्ये जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था केवळ भारताचीच आहे. योग्य आर्थिक सुधारणा झाल्या, तरच देशातील लोकांचे जीवनमान बदलू शकेल. जगभर अनिश्चिततेचा वातावरण असूनही भारतातील परकीय गुंतवणुकीमध्ये ३९ टक्के वाढ झाली आहे. (वृत्तसंस्था)