शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध जैसवाल ‘रॉ’चे प्रमुख होणार?, जूनमध्ये सूत्रे हाती घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:16 IST

सीबीआयचे विशेष संचालक प्रवीण सिन्हा यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर आता सीबीआय आणि ‘रॉ’च्या (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) प्रमुखांत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

हरीष गुप्तानवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक प्रवीण सिन्हा यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर आता सीबीआय आणि ‘रॉ’च्या (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) प्रमुखांत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या ३० एप्रिल रोजी सिन्हा निवृत्त होणार होते. सिन्हा यांना मुदतवाढ दिल्यामुळे आता सीबीआयचे सध्याचे संचालक आणि महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैसवाल यांचा येत्या जूनमधे ‘रॉ’चे संचालक होण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांच्या मते, ‘रॉ’चे विद्यमान संचालक समंत गोएल यांचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपुष्टात येत असून त्यांची वर्णी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी लागण्याची शक्यता आहे. हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे.सुबोध जैसवाल यांनी यापूर्वी ‘रॉ’मध्ये काम केलेले आहे. पुढील वर्षी जैसवाल सीबीआयमधून निवृत्त होणार आहेत. परंतु, जर जैसवाल यांची ‘रॉ’मध्ये संचालकपदी नेमणूक झाली तर त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळेल. सीबीआय आणि रॉ या दोन्ही संस्थांच्या कामकाजावर पंतप्रधान मोदी समाधानी असून या तीनही अधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिन्हा यांना मुदतवाढ देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, इंटरपोलच्या आशियातील कार्यकारी समितीच्या निवडणुकीत सिन्हा यांनी चीनच्या प्रतिनिधीचा पराभव केला. ही नेमणूक तीन वर्षांची असून, सिन्हा निवृत्त झाले तर या महत्त्वाच्या जागेवर भारताला पाणी सोडावे लागले असते.