शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

'बँकांचा तपासणी अहवाल माहिती अधिकारात द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:28 IST

सर्वोच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला स्पष्ट आदेश

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येणाऱ्या व्यावसायिक बँकांच्या वार्षिक तपासणीचा अहवाल माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रिझर्व्ह बँकेला दिले. न्या. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने म्हटले की, रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत कोणती माहिती जाहीर करायची याबाबतच्या धोरणाचा फेरआढावा घ्यावा. कायद्यानुसार हे बंधनकारक आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही न्यायालयीन बेअदबीची कारवाई करण्याचे टाळीत आहोत. रिझर्व्ह बँकेला पारदर्शकता कायद्याच्या अंमलबजावणीची शेवटची संधी देत आहोत. माहिती अधिकाराबाबत रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या नकारात्मक भूमिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे जर कायद्याचे असेच उल्लंघन झाल्याचे आढळून आले, तर त्याकडे गंभीर बाब म्हणून पाहिले जाईल. बँकांचा वार्षिक तपासणी अहवाल माहिती अधिकारात न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेविरुद्ध जानेवारीमध्येच न्यायालयीन बेअदबीची नोटीस काढली होती. रिझर्व्ह बँकेने आपल्या बचावात म्हटले की, बँकांच्या तपासणी अहवालातील काही माहिती ही ‘विश्वासात्मक’ स्वरूपाची आहे. त्यामुळे पारदर्शकता कायद्यांतर्गत हा अहवाल आम्ही देऊ शकत नाही. अग्रवाल यांनी नियम मोडल्याबद्दल दंड झालेल्या बँकांची माहिती रिझर्व्ह बँकेकडे मागितली होती. दंड ठोठाविण्याआधी ज्या बँकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या, त्यांची यादीही अग्रवाल यांनी मागितली होती.जाहीर करण्यापासून रोखण्याची रीतसर सवलत नसलेली कोणतीही माहिती पारदर्शकता कायद्यानुसार जाहीर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती रोखता येणार नाही, असे निर्देश याआधी सर्वोच्च न्यायालयाने तसेच केंद्रीय माहिती आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेला दिले होते. या निर्देशांनंतरही रिझर्व्ह बँकेने बँकांचा वार्षिक तपासणी अहवाल माहिती अधिकारात देण्यास नकार दिला होता. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते एस. सी. अग्रवाल यांनी रिझर्व्ह बँकेविरुद्ध न्यायालयीन बेअदबीचा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक