शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
3
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
4
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
5
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
6
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
7
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
8
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
9
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
10
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
11
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
12
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
13
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
14
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
15
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
16
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
17
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
18
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
19
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
20
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली

विद्यार्थ्यांनी देशसेवेचा वसा घ्यावा : भटनागर

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

तळेघर : शिक्षण घेत असताना समाजसेवेबरोबरचदेशसेवेचा वसा घ्या, असा सल्ला आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रमुख उपमहानिर्देशक आशिष भटनागर यांनी राजपूर (गाडेवाडी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.

तळेघर : शिक्षण घेत असताना समाजसेवेबरोबरचदेशसेवेचा वसा घ्या, असा सल्ला आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रमुख उपमहानिर्देशक आशिष भटनागर यांनी राजपूर (गाडेवाडी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदर्श असणार्‍या शासकीय आश्रम शाळा राजपूर (गाडेवाडी) या शाळेला आकाशवाणी पुणे केंद्राच्या टीमने भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भटनागर बोलत होते.
घोडेगाव प्रकल्पांतर्गत असणार्‍या या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार राज्यपाल सी. विद्यासागरराव, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते मुख्याध्यापक रमेश दोडके यांना प्रदान करण्यात आला. या भागामध्ये आदर्श समाज घडविण्याचे कार्य शाळा करत आहे. आदिवासी डोंगरदर्‍यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शाळेच्या भिंती बोलायला लावणारी शाळा प्रथमच पाहिल्याचे गौरवोद्गार आकाशवाणीचे पुणे कार्यक्रम अधिकारी अरुण सोळंकी यांनी काढले.
या वेळी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने शासकीय शाळा राजपूर (गाडेवाडी) यांना रेडिओ भेट देण्यात आला.
या वेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे उपमहानिर्देशक आशिष भटनागर, कार्यक्रम अधिकारी अरुण सोळंकी, अभियंता राजेकर, निवृत्ती बोराटे, मुकुंद झरेकर, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठल सुतदार, तिटकारे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक रमेश दोडके, ज्येष्ठ शिक्षक जी. डी. शिंदे, बी. एस. भंगे, हुलेसर, खमसेसर, बी. एस. सातपुते, एन. सी. रायकर उपस्थित होते.
फोटोओळ : आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने शासकीय आश्रमशाळा राजपूर (गाडेवाडी) यांना रेडिओ भेट देताना उपमहानिर्देशक आशिष भटनागर. (छायाचित्र : संतोष जाधव)