शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा पुन्हा प्रयत्न आनंदीबाई विद्यालयातील प्रकार : संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

By admin | Updated: March 10, 2016 00:26 IST

जळगाव: गेल्या आठवड्यात विद्यार्थी अपहरण प्रकरणाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारीही आनंदीबाई देशमुख बालक विद्या मंदिर या विद्यालयातून पाचवीच्या वर्गातील अबुजर निसार खाटीक (वय १०, रा.शिवाजी नगर) या विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला.अन्य विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेने हा प्रयत्न असफल झाला आहे. दरम्यान, राजेंद्र लोटन चौधरी (वय ४७ रा.मांजरोद, ता.शिरपुर जि.धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जळगाव: गेल्या आठवड्यात विद्यार्थी अपहरण प्रकरणाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारीही आनंदीबाई देशमुख बालक विद्या मंदिर या विद्यालयातून पाचवीच्या वर्गातील अबुजर निसार खाटीक (वय १०, रा.शिवाजी नगर) या विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला.अन्य विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेने हा प्रयत्न असफल झाला आहे. दरम्यान, राजेंद्र लोटन चौधरी (वय ४७ रा.मांजरोद, ता.शिरपुर जि.धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवाजी नगरात राहणार्‍या अबुजर व अन्य विद्यार्थ्यांना रिक्षा चालक सचिन इधापे याने सकाळी साडे अकरा वाजता शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले. त्यानंतर काही वेळातच राजेंद्र लोटन चौधरी हा मद्यपी तेथे आला. अबुजर याला पकडून तो समोरील दारुच्या दुकानात घेवून गेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मद्यपीला काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर अबुजरला शाळेत आणले. किरकोळ प्रकार असल्याने हा विषय कोणी गांभीर्याने घेतला नाही.
पुन्हा आला शाळेत
शाळेच्या काही मुलांनी मारहाण केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. नंतर काही वेळाने चौधरी हा पुन्हा शाळेत आला व अबुजरला तोंड दाबून बाहेर घेवून गेला. हा प्रकार नववीच्या विद्यार्थ्यांनी पाहिला, त्यांनी लागलीच त्याच्या दिशेने धाव घेत चौधरीच्या तावडीतून त्याची सुटका केली. यावेळी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याला पकडून ठेवण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनीच पकडून ठेवले
गेल्या आठवड्यातील घटना लक्षात घेता मुख्याध्यापिका सुचिता तारे व काही विद्यार्थ्यांनी शहर पोलीस स्टेशनला झाल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे प्रीतम पाटील,संजय भालेराव व अकरम शेख यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी चौधरीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता त्याची ओळख स्पष्ट झाली. तो मद्याच्या नशेत असल्याने बडबड करीत होता. त्यामुळे खरोखरच अपहरणाचा उद्देश होता की नाही याचा उलगडा झाला नाही.
अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
राजेंद्र चौधरी याच्यावर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा कलम ३६३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत त्याची चौकशी केली असता ठोस अशी काहीच माहिती त्याने दिली नाही. आपण साधू असल्याचेही तो पोलिसांना सांगत होता.