शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल; ११,८०० कोटींचे थकबाकीदार विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:14 IST

दिलेल्या एकूण कर्जापैकी जवळपास १६ टक्के रक्कम थकीत ही आकडेवारी चिंताजनक आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, दिल्ली : उच्च शिक्षणासाठीचं स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम व शिक्षणातील नवी दिशा देणारे साधन ठरलेले शैक्षणिक कर्ज आता अनेक विद्यार्थ्यांसाठी आर्थिक ओझं ठरतं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या तीन वर्षात तब्बल ७७,६८८ कोटी रुपयांची शैक्षणिक कर्जे वितरित केली, मात्र त्यातील ११,७९८ कोटी रुपयांची कर्जे अपयशी (NPA) झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणजेच, दिलेल्या एकूण कर्जापैकी जवळपास १६ टक्के रक्कम थकीत ही आकडेवारी चिंताजनक आहे.

राज्यानुसार पाहता, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक म्हणजे ११,४२६ कोटी रुपयांची कर्जे घेतली आहेत. त्यानंतर केरळ (८,९३७ कोटी), आंध्र प्रदेश (८,१०१ कोटी) आणि तामिळनाडू (७,१९८ कोटी) या राज्यांचा क्रम लागतो. या चार राज्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा खर्च जास्त असल्याने विद्यार्थ्यांकडून कर्ज घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. उत्तर प्रदेश (३,४६१ कोटी) आणि पश्चिम बंगाल (३,१५६ कोटी) यांसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांत तुलनेने कमी कर्जवाटप झाले आहे. 

लहान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मात्र परिस्थिती वेगळी आहे. लडाखमध्ये २,७८४ कोटी आणि गोव्यात ८६३ कोटी रुपयांची कर्जवाटप झाल्याने तेथील प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत मोठं आहे. बँकांच्या आकडेवारीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हिनेच सर्वाधिक म्हणजे ३२,३११ कोटी रुपयांचेकर्ज दिले. युनियन बँक ऑफ इंडिया (१४,५५८ कोटी) आणि बँक ऑफ बडोदा (८,४६८ कोटी) पुढील क्रमांकावर आहेत. परंतु परतफेडीच्या बाबतीत काही प्रमुख बँकांना मोठ्या थकबाकीचा सामना करावा लागत आहे. पंजाब नॅशनल बँकेत २,०५७ कोटी, कॅनरा बँकेत १,९५४ कोटी आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये १,६१७ कोटी रुपयांची थकीत रक्कम नोंदवली गेली आहे.

गेल्या काही वर्षांत शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी मोठी फी, मर्यादित रोजगार संधी आणि विलंबित परतफेड यामुळे अनेक कर्जे थकबाकीत जात आहेत.

शैक्षणिक कर्जवितरण (२०२२-२३ ते २०२४-२५ रक्कम कोटीत)

राज्य कर्ज रक्कममहाराष्ट्र ११,४२६.४७

केरळ ८,९३७.७८

आंध्र प्रदेश ८,१०१.०६

तामिळनाडू ७,१९८.६३

तेलंगणा ६,१७८.६०

कर्नाटक ५,७२१.१९

उत्तर प्रदेश ३,४६१.०८

पश्चिम बंगाल ३,१५६.१६

लडाख २,७८४.२७

गुजरात २,३१५.०७

एकूण (भारत) ७७,६८८.३८

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Tops in Education Loan Defaults; ₹11,800 Crore Outstanding

Web Summary : Maharashtra leads in education loan defaults, with ₹11,426 crore outstanding. Nationally, ₹77,688 crore was disbursed, but ₹11,798 crore became NPA. High fees and limited job opportunities contribute to defaults, impacting students' dreams.
टॅग्स :Educationशिक्षण