शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' शब्दावरून सुषमा स्वराजांनी घेतली काश्मिरी तरुणाची 'झाडाझडती'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:10 IST

'इंडिया ऑक्युपाईड काश्मीर'  (IOK) असल्याचा उल्लेखही त्याने ट्विटरवर केला होता.

नवी दिल्ली: ट्विटरवर प्रचंड सक्रिय असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आतापर्यंत अनेकांनी आपल्या समस्या सांगितल्या आहेत. स्वराज यांनीही तात्काळ प्रतिसाद देत या समस्या सोडविण्याची बाब काही नवीन राहिलेली नाही. मात्र, गुरूवारी ट्विटर पोस्टवर घडलेल्या एका प्रसंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानिमित्ताने पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांचा हजरजबाबीपणा आणि सजगतेचा प्रत्यय आला. अतिक शेख या काश्मिरी तरुणाचे ट्विट यासाठी निमित्त ठरले. या तरूणाने ट्विटरवरून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, मी जम्मू-काश्मीरमधील असून सध्या फिलीपाईन्समध्ये वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहे. माझा पासपोर्ट खराब झाला आहे. त्यासाठी मी महिनाभरापूर्वी अर्जही केला होता. वैद्यकीय तपासणीसाठी मला तातडीने घरी जाणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही नवा पासपोर्ट मिळवून देण्यात माझी मदत करावी, असे अतिक शेख याने ट्विटमध्ये म्हटले होते. सुरूवातीला हा संदेश पाहून सुषमा स्वराज नेहमीप्रमाणे त्याला मदत करतील, असे सगळ्यांना वाटले. परंतु, स्वराज यांनी या तरूणाला पद्धतशीरपणे दिलेले उत्तर पाहून अनेकजण अवाक झाले. हा तरूण मुळचा काश्मीरचा असला तरी त्याने आतापर्यंत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेकदा पाकिस्तानी नेत्यांचे समर्थन केले आहे. याशिवाय, आपण 'इंडिया ऑक्युपाईड काश्मीर'  (IOK) असल्याचा उल्लेखही त्याने ट्विटरवर केला होता. हाच धागा पकडत सुषमा स्वराज यांनी या तरूणाची अक्षरश: झाडाझडती घेतली. स्वराज यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, तू जम्मू-काश्मीरचा असशील, तर तुला नक्की मदत केली जाईल. परंतु तुझ्या प्रोफाईलवर नमूद केलेल्या माहितीनुसार, तू 'इंडियन ऑक्युपाईड काश्मीरमध्ये' राहणारा दिसतोस. असे कोणतेही ठिकाणच अस्तित्त्वात नाही, असे सांगत स्वराज यांनी या तरुणाला निरुत्तर केले. या सगळ्या प्रकारानंतर संबंधित तरुणाने आपले ट्विट डिलीट केले. 

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजJammu Kashmirजम्मू-काश्मीर