शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीने तयार केले पहिले कार्बन निगेटिव्ह शौचालय; माती, पाणी, सिमेंटचा वापर नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 07:03 IST

चार लाख प्लास्टिक पिशव्यांवर पुर्नप्रक्रिया करून बांधकामात वापर

अमृतसर : केवळ एकाच वेळी वापरता येणाऱ्या (सिंगल यूज) सुमारे चार लाख प्लास्टिक पिशव्या व कचऱ्यातील इतर काही गोष्टींवर पुर्नप्रक्रिया करून त्यांच्या साहाय्याने रुहानी वर्मा या इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने  देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह सार्वजनिक शौचालय उभारले आहे. अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात बांधलेल्या या शौचालयाला ‘टॉयलेट ०१’ असे नाव देण्यात आले आहे. 

या शौचालय संकुलाचे अमृतसर विमानतळाचे संचालक व्ही.के. सेठ व खासदार गुरजीत अलुजा यांनी नुकतेच उद्घाटन केले. जयपूर येथील जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असलेल्या रुहानी वर्मा हिने सांगितले की, देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह सार्वजनिक शौचालय तयार करण्यासाठी पर्यावरणाची अजिबात हानी न करणाऱ्या विटांचा वापर केला आहे. या शौचालयाच्या बांधकामात वापरलेल्या विटांपैकी ३० टक्के विटा या सिंगल यूज प्लास्टिकपासून तर ७० टक्के विटा या कचरा,  सिलिका डस्टपासून तयार केल्या आहेत. रुहानी वर्मा हिने सांगितले की, सिंगल यूज प्लास्टिकनेही पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. दरवर्षी ही समस्या तीव्र होत चालली आहे.

माती, पाणी, सिमेंटचा वापर नाही 

रुहानी वर्मा हिने सांगितले की, पहिले कार्बन निगेटिव्ह शौचालय उभारण्यासाठी वापरलेल्या सिलिका विटा तयार करताना माती, पाणी, सिमेंट आदी गोष्टींचा वापर केलेला नाही. कचऱ्यातील गोष्टींपासून या विटा तयार करण्यात आल्या आहेत. त्याआधी या सर्व गोष्टींवर पुर्नप्रक्रिया करण्यात आली. मातीच्या विटेपेक्षा सिलिकाची वीट ही तीनपट मजबूत असते.

आणखी पर्यावरणस्नेही वास्तू उभारणार

रुहानी वर्मा हिने सांगितले की, अमृतसर येथील विमानतळावर उभारण्यात आलेले कार्बन निगेटिव्ह शौचालय बांधण्यासाठी पुर्नप्रक्रिया केलेल्या चार लाख प्लास्टिक पिशव्या वापरण्यात आल्या. या पिशव्या एका सरळ रेषेत मांडल्या तर त्यांची लांबी १५० किमी होईल. रुहानी वर्मा भविष्यात आणखी पर्यावरणस्नेही वास्तू उभारणार आहे. 

टॅग्स :Punjabपंजाब