शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, भाजपतील संघर्ष उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 04:59 IST

लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.आपल्या अनेक कार्यालयांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ले केले असून, अनेक कार्यालये ताब्यात घेण्यात आली आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील सीताई आणि तितागढ तसेच कोलकाताजवळील न्यू टाऊन भागात भाजप समर्थकांनी तृणमूल कार्यकर्त्यांवर हल्ले केले आहेत. भाजप विजयी झालेल्या कूचबिहारमधील बक्षीरहाट, महिशकुची, रामपूर आणि शालबारी येथील तृणमूलची कार्यालये भाजप समर्थकांनी उद्ध्वस्त केली. सितलकुची येथील कार्यालयही फोडण्यात आले.तृणमूलचे सितलकुची गटाचे अध्यक्ष आबेद अली मिया यांनी सांगितले की, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयांना एक तर कुलपे लावली अथवा कार्यालयांची तोडफोड केली.कुचबिहार लोकसभा मतदारसंघात भाजपचे निशित प्रामाणिक यांनी तृणमूलचे परेश अधिकारी यांचा पराभव केला आहे.भाजपनेही तृणमूल कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप केला आहे. बक्षीरहाट येथील विजयी मिरवणुकीवर तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूलने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.तृणमूल काँग्रेसने म्हटले की, सीताई येथील आपल्या महिला नेत्याच्या घरावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला. भाजपचा विजय झालेल्या बंकुरा येथेही अशीच घटना घडली. भाजपने म्हटले की, बंकुरा येथे आपल्या एका स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विवेकानंद पात्रा यांनी सांगितले की, सालतोरा येथे स्थानिक भाजप नेते विद्युत दास यांच्यावर विजयी मिरवणुकीदरम्यान हल्ला करण्यात आला. स्थानिक तृणमूल नेता काली रॉय यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अरूप खान यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे. दोन्ही बाजूंनी तक्रारी देण्यात आल्याचे बंकुरा पोलिसांनी सांगितले. पंचमुरा जिल्ह्यात तृणमूलच्या कामगार संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले. काही नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले.>वाहने जाळलीभाजप विजयी झालेल्या बराकपूरमधील भातपारा आणि काकिनाडा येथेही तृणमूलच्या कार्यालयांवर हल्ले झाले. अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली. नादिया जिल्ह्यातील चाकडाह येथील २३ वर्षीय भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.