शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 15:20 IST

गरबा कार्यक्रमावर दगडफेक केल्याप्रकरणी मुस्लीम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली.

गरबा कार्यक्रमावर दगडफेक केल्याप्रकरणी काही मुस्लीम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून सर्व लोकांसमोर लाठीने मारहाण केल्याची घटना गुजरातमध्ये घडली होती. त्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी त्या घटनेवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही त्या घटनेवर संताप व्यक्त केला आणि भाजप सरकारवर टीका केली.

काय म्हणाले ओवेसी?

गुजरातच्या भाजप सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले की, 'भारतात रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा सन्मान केला जातो, परंतु मुस्लिमांचा नाही. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे, तिथे तिथे मुस्लिम लोक खुल्या तुरुंगात राहत असल्यासारखे दिसतात. गुजरातमध्ये नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमात दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम तरुणांना खांबाला बांधून 300-400 लोकांसमोर लाठीने मारहाण केली. मुस्लिम तरुणांना मारहाण करताना लोक घोषणाबाजीही करत होते.'

नेमकं काय झालं?काही दिवसांपूर्वी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील उंडेला गावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमावर मुस्लिम समाजातील काही लोकांनी दगडफेक केली होती, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह 7 जण जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हल्लेखोरांनी मशिदीजवळ आयोजित गरबा कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. दगडफेकीच्या आरोपाखाली पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस तीन आरोपींना खांबाला बांधून बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

45 जणांची ओळख पटलीया घटनेत नोंदवलेल्या एफआयआरनुसार, महिलांसह सुमारे 150 लोकांच्या जमावाने गरबा करत असलेल्या लोकांवर दगडफेक केली. यापैकी 45 जणांची ओळख पटली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर सभा आणि जाणूनबुजून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनGujaratगुजरातGarabaGaraba