शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या प्रेमाची गोष्ट ! बंगळुरुत "तिने" केलं "तिच्याशी" लग्न

By admin | Updated: July 5, 2017 11:28 IST

बंगळुरुमधील कदाचित हे पहिलंच लेस्बिअन लग्न असावं

ऑनलाइन लोकमत
 
बंगळुरु, दि. 5 - बंगळुरुमधील कदाचित हे पहिलंच लेस्बिअन लग्न असावं. एका मंदिरात 25 वर्षीय तरुणीने 21 वर्षीय तरुणीशी लग्न केलं असून या जोडप्यातील लहान तरुणीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस सध्या या तरुणींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा लग्न करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून, याचे नकारात्मक परिणाम होतील अशी समज पोलीस काढत आहे. पण या तरुणी कोणाचंही काहीच ऐकायला तयार नसून पोलिसांच्या नाकी दम आणला आहे. 
 
लग्न करणा-या या दोन्ही तरुणी एकमेकांच्या नातेवाईक आहेत. यामधील कमी वयाची तरुणी बंगळुरुमधील एका खासगी कॉलेजात बी.कॉम शिकत आहे. तिचे वडिल लग्न लावण्याचं काम करतात. दुसरी तरुणी एका कॉलसेंटरमध्ये काम करते आणि तिचे वडिल एक व्यवसायिक आहेत. बदनामीच्या भीतीने या मुलींची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. 
 
आणखी वाचा - 
.. म्हणून त्या मुस्लिम इंजिनिअरने घातला बुरखा
नायट्रोजन कॉकटेलमुळे पोटात छिद्र पडलेल्या व्यावसायिकाचा मृत्यू
बिअर आरोग्यदायी पेय; आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांचं विधान
 
या जोडप्यातील कमी वयाची तरुणी "पत्नी" तर दुसरी "पती" आहे. "पती"ने पोलिसांना सांगितलं की, मी लहान वयातच माझ्या "पत्नी"कडे आकर्षित झालो होतो. "पत्नी" जुन्या विचारसणीच्या कुटुंबातील असून, नव्या पिढीतील गोष्टी शिकण्याचा ती प्रयत्न करत आहे. मी तिला आधुनिक बनवण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहे. तिला मॉलमध्ये घेऊन गेलो आणि काही वेस्टर्न कपडे तसंच गिफ्ट्स घेऊन दिले. 
 
मे 2017 मध्ये दोघींनी घरातून पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या या निर्णयाला दोघींचे कुटुंब पाठिंबा देणार नाही याची कल्पना असल्याने दोघींनी घरात कोणतीही माहिती न देता पळून जाण्याचा निर्णय घेतला.  "पत्नी"ने आधी पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास सुरुवात केली. दरम्यान "पती"ने दुसरं घर शोधलं. दोन आठवड्यानंतर दोघींनी एकत्र राहण्यास सुरुवात केली. 
 
पोलिसांनी दोघींचा शोध घेतला आहे. मात्र दोघीही जाणत्या असल्याने कारवाई करु शकत नाहीत. आम्ही दोघी एकमेकींसोबत अत्यंत आनंदात असून आम्हाला परत यायचं नाही असं दोघींनी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कळवलं आहे. 
 
दोघींनी एकमेकींशी लग्न केलं असल्याचं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं. वरिष्ठ काऊंसलर बी एस सरस्वती दोघींशी बातचीत करत असून त्याचं काऊंसलिंग सुरु आहे. भारतात समलैंगिक लग्नाला मान्यात नाही. सर्वोच्च न्यायालयाने 2013 रोजी कलम 377 ला गुन्हेगारी वर्गात आणण्याचा निर्णय सुनावला होता.