सातपुडा जंगलातील अतिक्रमण थांबवा धरणे आंदोलन : आग लावणार्यांवर कठोर कारवाई करा
By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST
जळगाव : सातपुडा जंगलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बोगस वन हक्क दावे दाखल केले जात आहे. त्यासोबत जंगलाला आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने जंगल नष्ट करणार्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सोमवार २१ रोजी जागतिक वनदिनी धरणे आंदोलन करण्यात आले.
सातपुडा जंगलातील अतिक्रमण थांबवा धरणे आंदोलन : आग लावणार्यांवर कठोर कारवाई करा
जळगाव : सातपुडा जंगलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बोगस वन हक्क दावे दाखल केले जात आहे. त्यासोबत जंगलाला आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने जंगल नष्ट करणार्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सोमवार २१ रोजी जागतिक वनदिनी धरणे आंदोलन करण्यात आले.सातपुडा जंगल बचाव समितीचे संत बाबा महाहंसजी महाराज यांच्यासह बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, राहुल सोनवणे, शिवलाल बारी, राजेंद्र नन्नवरे, पक्षीमित्र केशर उपाध्ये, योगेश गालफाडे, प्रदीप शेळके, चेतन भावसार, आशाबाई पाटील, सिंधूबाई पाटील, चंद्रभागाबाई पाटील, प्रतिभाबाई पाटील, ज्योती पाटील, निर्मला पाटील, सखुबाई पाटील, गोरख मराठे, ऋषी राजपूत, हेमराज सोनवणे यांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.सातपुडा जंगलात पूर्वी सहज मिळून येणारे सागवान, तीवस, खैर, सिसम, धावडा, कड, अंजन हे मौल्यवान वृक्ष दुर्मीळ होत आहे. सफेद मुसळी, कृष्णमुसळी, अर्जुन, शतावरी, अश्वगंधा, बेहडा या वनऔषधी गायब झाल्याचा आरोप संत बाबा महाहंसजी यांनी आपल्या मार्गदर्शनात केला. सातपुडा जंगलात नवाड (नवे अतिक्रमण, डिंकाची तस्करी, लाकडाची तस्करी, शिकार करण्यासाठी आगी लावण्यात येत आहे. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.जंगलात लावण्यात येणार्या आगींना थांबविण्यासाठी व बोगस वनहक्क दाव्यांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच वन संपदेच्या नुकसान भरपाईसाठी दोषी आढळून येणारे वनअधिकारी व वनमाफिया यांच्याकडून रक्कम वसुलीचे कठोर नियम करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यानंतर जंगल बचाव संस्थेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.