शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कर्नाटकात करौलीसारखी घटना, शोभा यात्रेवर दगडफेक, परिस्थिती तणावपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:11 IST

रामनवमीच्या मुहूर्तावर शोभा यात्रा काढण्यात येत होती. ही यात्रा जहांगीर मोहल्ला  (Jahangir Mohalla) येथून जात असताना काही उपद्रवी घटकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

बंगळुरू : रामनवमीनिमित्त (Ram Navami)काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर कर्नाटकातील कोलारमध्ये तणाव निर्माण झाला. येथे रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी काही उपद्रवी घटकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, नुकतेच राजस्थानमधील करौली येथे हिंदू समाजाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती.

रामनवमीच्या मुहूर्तावर शोभा यात्रा काढण्यात येत होती. ही यात्रा जहांगीर मोहल्ला  (Jahangir Mohalla) येथून जात असताना काही उपद्रवी घटकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच, याप्रकरणी  4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

करौली येथेही घडली होती अशी घटना राजस्थानमधील करौली शहरात नवसंवत्सरनिमित्त काढण्यात आलेल्या बाइक रॅलीनंतर हिंसाचार उसळला होता. काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीमुळे जातीय तेढ निर्माण झाल्याने मुस्लिमबहुल परिसरात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. यादरम्यान रॅलीत सहभागी लोकांवर जोरदार दगडफेक सुरू झाली. यासोबतच सुमारे 100-150 जणांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात 8 पोलिसांसह 11 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटक