शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेसाठी अतिरिक्त आयुक्त मिळेना ठाण्यातील स्थिती : सहा महिन्यांपासून खुर्ची रिकामी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पंकज रोडेकर

पंकज रोडेकर
ठाणे : शहर पोलीस दलातील अति महत्त्वाचे समजले जाणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. त्यातच नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने गुन्हेगारीतही वाढ होत असून गुन्हे शाखेच्या एका युनिटच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन पोलिसांना लाच घेताना अटक झाल्याने गुन्हे शाखेवर नागरिकांनी विश्वास का ठेवावा, असा प्रश्न ठाणेकरांना पडू लागला आहे.
२०१४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची बदली झाली. त्या जागी डॉ. रवींद्र सिंघल हे अतिरिक्त आयुक्त म्हणून ठाण्यात आले. मात्र, ४ महिन्यांनंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात त्यांची मध्य रेल्वेच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे त्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. राज्यात युतीचे सरकार येऊन १०० दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतरही ठाण्यासारख्या आयुक्तालयाला अतिरिक्त पोलीस आयुक्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात सोनसाखळी चोरी आणि छेडछाडीचेही प्रकार वाढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तत्कालीन अधिकारी भारंबे यांनी सोनसाखळी चोरट्यांवर वचक बसविण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाईकेली होती. त्यानंतर, आलेल्या डॉ. सिंघल यांनी सोनसाखळीच्या घटनांचा अभ्यास करून पोलिसांनी थेट नागरिकांनी संवाद साधून कशी खबरदारी घ्यावी, तसेच या घटना रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे ठाणेकरांमध्ये जगजागृती केली. तसेच फेसबुक या सोशल मीडियाची मदत घेतली होती. मात्र, ते गेल्यानंतर हे बंद झाले. याचदरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन पोलीस शिपायांना हजारो रुपयांची लाच घेताना पकडले आहे. या रिक्त पदाबाबतचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठविला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. (प्रतिनिधी)
....................
प्रथमच पद रिक्त
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २०१० साली अतिरिक्त पोलीस आयुक्त हे पद निर्माण झाले. तेव्हापासून २०१४ पर्यंत हे पद कधीच रिक्त नव्हते. अशोक धिवरे हे पहिले अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून ठाण्याला लाभले. त्यानंतर, एस.ए. कक्कड, एस.ए. पाण्डेय, प्रशांत बुरडे, धनंजय कमलाकर, मिलिंद भारंबे आणि डॉ. रवींद्र सिंघल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुरा सांभाळली. प्रत्येकाने आपल्या कालावधीत वेगवेगळ्या उपाययोजना राबवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला.