आमरेली : गुजरातच्या आमरेली जिल्ह्यातील हरी कृष्णा तलावाच्या काठावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. २०१८ मध्ये सरोवराजवळील उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला होता. सुरत येथील प्रख्यात हिरे व्यावसायिक सावजीभाई ढोलकिया यांच्या ‘ढोलकिया फाऊंडेशन’ने या तलावाची निर्मिती केलेली आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.लाठी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाय. पी. गोहील यांनी सांगितले की, पुतळ्याच्या तोडफोडीची घटना काल रात्री घडली. आरोपींचा शोध सुरू आहे. तलावामुळे असंतुष्ट असलेल्यांचे अथवा समाजकंटकांचे हे कृत्य असू शकते.
गुजरातमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:47 IST