राज्य-थोडक्यात-विदर्भ
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
राज्य-थोडक्यात-विदर्भ
राज्य-थोडक्यात-विदर्भ
राज्य-थोडक्यात-विदर्भशहरात चोरट्यांचा हैदोसनागपूर : शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला असून वाडी, अंबाझरी आणि कळमन्यात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. डिफेन्स वसाहतीत राहाणारे दीपक महादेव डोंगरे (वय ४४) हे १२ फेब्रुवारीला सहपरिवार बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच ५०० रुपये, असा एकूण १ लाख, २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. डोंगरे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पर्समधून मंगळसूत्र लंपासनागपूर : गर्दीचा लाभ उठवत एका महिलेच्या पर्समधून तिचे ५५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ज्योती देवीदास हेमणे (वय ४०, रा. हिंगणघाट, वर्धा) या सीताबर्डीतील बाजारपेठेत रविवारी दुपारी ४ वाजता खरेदी करीत असताना ही घटना घडली. हेमणे यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.चाकूहल्लयात तरुण गंभीर जखमीनागपूर : क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला दोघांनी चाकूने मारून गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. वाडीतील शिवाजी नगरात राहाणारा पलाश तुकारामजी अनरसकर (वय १९) आसीफ खान नामक मित्रासोबत फुटाळा चौपाटीवर फिरायला गेला होता. तेथून परत येत असताना भरतनगरात आरोपींनी पलाशच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.कुरखेडा तालुक्यात आठ मातामृत्यू कुरखेडा (गडचिरोली) : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे कुरखेडा तालुक्यात चालू वर्षात आठ मातांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोरची तालुक्यात पाच माता मृत्यूंची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे गरोदर मातांना स्थानिकस्तरावरच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.विवाहितेचा छळनवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखलचांदूरबाजार : तालुक्यातील थूगाव पिंपरी येथील देवानंद रामचंद्र बोदुडे याने त्याची पत्नी पल्लवी देवानंद बोदुडे हिला माहेरुन पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच तू दिसायला सुंदर नाही, असे म्हणून तिचा शारीरिक छळ केला. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांंनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पूर्णानगर मार्गावर कारची दुचाकीला धडकअमरावती: आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलेश रामराव रुपनारायण हे त्यांच्या दुचाकीने पूर्णानगरकडून अमरावतीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच.२७-ए.सी.००३७ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ते जखमी झाले.याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.जास्त प्रमाणात औषध घेतल्याने युवतीचा मृत्यूवर्धा : औषधाच्या गोळ्या अधिक प्रमाणात सेवन केल्याने उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला. ऋचा भोंगाडे रा. तुकडोजी वॉर्ड असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.