शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राज्य-थोडक्यात-विदर्भ

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

राज्य-थोडक्यात-विदर्भ

राज्य-थोडक्यात-विदर्भ
रेती चोरणार्‍या ट्रॅक्टर
चालकावर गुन्हा दाखल
गोंदिया : पांजरा येथील रेतीची तस्करी करणार्‍या ट्रॅक्टर चालकावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विलास बाबुराव शहारे (३२) याने एमएच३५ जी ११६४ मध्ये एक ब्रास रेती भरून वाहून नेत असताना तलाठी परसराम मरस्कोल्हे (४८) यांनी त्याला अटक केली. सदर घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रवासात दिले गंुगीचे औषध
वर्धा : नागपूर येथून रेल्वेने वर्ध्याला परत येत असताना प्रवासादरम्यान तुळजापूर (वघाळा)य् ोथील अतुल खुशाल मोहदुरे (३२) याला अनोळखी व्यक्तीने चिवड्यातून गंुगीचे औषध दिले. संशय येताच अतुल दुसर्‍या डब्यात गेला आणि प्रवाशांना आपबिती सांगून बेशुद्ध झाला. प्रवाशांनी अतुलच्या पत्नीला भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. अतुलला त्याच्या नातेवाईकांनी वर्धा रेल्वेस्थानकावर उतरवून घेतले. सेवाग्राम रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.

भांडणात मध्यस्थी करणार्‍यास मारहाण
अमरावती : भांडणादरम्यान सुरू असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाला डोक्यावर काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. संतोष तरोणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अनुप दंडे याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

सासर्‍याकडून सुनेची फसवणूक
नागपूर : पतीच्या नावाने असलेली टाटा एस गाडी पतीच्या मृत्यूनंतर सासर्‍याने बनावट कागदपत्र तयार करून आपल्या नावावर करून घेतल्याची तक्रार दिल्यावरुन जरीपटका पोलिसांनी सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जया संजय कडू (२८) रा. ७६, हाऊसिंग कॉलनी, लता भापकर यांचे घरी किरायाने, कळमेश्वर आणि आरोपी सदाशिव नत्थुजी कडू (७०) रा. पारडी, ता. कळमेश्वर नात्याने सून व सासरे आहेत. जया कडू यांच्या पतीच्या नावे टाटा एस ही चारचाकी गाडी होती. पतीच्या मृत्यूनंतर ही गाडी ४ एप्रिल २०१२ ते १२ डिसेंबर २०१२ या काळात सासर्‍याने बनावट कागदपत्र तयार करून स्वत:च्या नावावर केल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्रवाशांचा २.३६ लाखांचा
मुद्देमाल लंपास
नागपूर : रेल्वे प्रवासात गाढ झोपी गेल्याचा फटका दोन प्रवाशांना बसला. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन संघमित्रा एक्स्प्रेस आणि समरसता एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपीने गुरुवारी त्यांचे दागिने आणि रोख असा एकूण २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.