शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज -ना.खडसे

By admin | Updated: September 14, 2015 00:39 IST

जळगाव- दुष्काळाचा सामना करण्यासाठी करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना व जनतेला दिलासा देण्यासाठी शासन जलद व गतीने काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करु नये असे आवाहन राज्याचे कृषी व महसूल मंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी केले आहे. त्यांनी दुष्काळी व टंचाईग्रस्त भागात शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या योजनांची व उपाययोजनांची माहिती दिली. आतापर्यंत दुष्काळी भागातील पाणी पुरवठ्यासाठी शासनाने १५८ कोटी रु. उपलब्ध करुन दिले आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, सोलापूर व नगर या जिल्‘ामध्ये चाराछावणीसाठी १४२ कोटी रु. विभागीय आयुक्तांनी उपलब्ध करुन दिले आहे. खरीपासाठी २०१४ वर्षातील देणी एकूण २८१४ कोटी रु.चे वाटप केले आहे. त्यामधील ४०० कोटी रु. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना

जळगाव- दुष्काळाचा सामना करण्यासाठी करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना व जनतेला दिलासा देण्यासाठी शासन जलद व गतीने काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करु नये असे आवाहन राज्याचे कृषी व महसूल मंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी केले आहे. त्यांनी दुष्काळी व टंचाईग्रस्त भागात शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या योजनांची व उपाययोजनांची माहिती दिली. आतापर्यंत दुष्काळी भागातील पाणी पुरवठ्यासाठी शासनाने १५८ कोटी रु. उपलब्ध करुन दिले आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, सोलापूर व नगर या जिल्‘ामध्ये चाराछावणीसाठी १४२ कोटी रु. विभागीय आयुक्तांनी उपलब्ध करुन दिले आहे. खरीपासाठी २०१४ वर्षातील देणी एकूण २८१४ कोटी रु.चे वाटप केले आहे. त्यामधील ४०० कोटी रु. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना वाटप केले आहे. दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या भागातील जनतेला दोन रु.कि. दराने स्वस्त धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वीज बिलात माफी देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने तसेच पीक कर्ज व इतर कर्जावरील व्याज माफीचा निर्णय शासनाने पूर्वीच जाहीर केला आहे. कर्जाचे पुर्नगठण करण्यात येत आहे. अल्पभूधारक, शेतमजूर, महिला बचत गट यांना दुधाळ गाई व म्हशी उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने मागील सरकारच्या निर्णयात बदलद करणे शक्य आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकरचे अधिकार जिल्हा तालुकावार देण्यात येणार आहे. धरणातील पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी दुष्काळ व टंचाईग्रस्त भागासाठी अतिरिक्त उपाय योजना करण्यासाठी मंत्री मंडळ उपसमितीची बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी जनतेच्या हिताच्या दृष्टीने अजून काही निर्णय घेण्यात येणार आहे.