राज्य-महत्वाचे-नगर
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
महिलेचा मृत्यू
राज्य-महत्वाचे-नगर
महिलेचा मृत्यूअहमदनगर : भिंगार येथील शाला महादेव अळकुटे (रा.वडारवाडी)या विवाहित महिलेच्या पोटात विषारी औषध गेल्याने सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.-------------------महिलेवर चाकूने हल्लाअहमदनगर : घरातील भांडणामध्ये मध्यस्थी करणार्या स्वाती प्रशांत दुसुंगे (रा. कापुरवाडी शिवार) या महिलेस शिवीगाळ करून तिच्यावर वार केल्याची घटना रविवारी रात्री कोल्हेवाडी येथे घडली. स्वाती या त्यांच्या आईला भेटण्यासाठी माहेरी कोल्हेवाडी येथे गेल्या होत्या. यावेळी घरातील वाद मिटविण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने दत्तात्रय रोहिदास कराळे (रा. दत्तवाडी, कापुरवाडी) यांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ केली.------------युवकास मारहाणअहमदनगर: मागील भांडणाचा राग आल्याने तिघांनी मोटारसायकलवरून जाणार्या शुभम शिरीष दारकुंडे (रा. शिवकृपा कॉलनी, वैदुवाडी) यांना अडवून अंगावर मिरची पूड टाकून लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून घेतली. ही घटना रविवारी रात्री पाईपलाईन रोडवरील वाणीनगर कमानीजवळ घडली. या प्रकरणी दारकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल भागवत, किरण ढवाण, सोहेल शेख (रा. पाईपलाईन रोड)यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.