अहमदनगर : जिल्हा बुद्धिबळ संघटना व डीएलबी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्व़ मोतीलाल फिरोदिया राज्य अजिंक्यपद मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ शहरातील सप्तक सदन सभागृहात दि़ २२ ते २६ एप्रिल दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले़ स्व़ मोतीलाल फिरोदिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जागतिक बुद्धिबळ महासंघ, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व राज्य संघटना यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येत आहे़ १७०० पेक्षा कमी मानांकित गट व १७०० पेक्षा जास्त मानांकित गट अशा विविध गटांत ही स्पर्धा होणार आहे़ प्रथम येणार्या स्पर्धकाला ३१ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ तसेच विविध गटांमध्ये उत्तेजनार्थ ३५ करंडक देण्यात येणार आहेत़ ही स्पर्धा राज्यातील सर्व खेळाडुंसाठी खुली आहे़ जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वर्षातून अनेकदा बुद्धिबळ स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येते़ अनेक ग्रँड मास्टरांनी नगरमध्ये येवून खेळाडुंना मार्गदर्शन केले असल्याचे संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले़ या स्पर्धेत जिल्ह्यासह राज्यभरातील स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे़
नगरमध्ये राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा
By admin | Updated: April 20, 2015 13:12 IST