राज्य शासनाचे अपील खारीज
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे चंद्रपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचे अपील खारीज केले आहे.
राज्य शासनाचे अपील खारीज
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे चंद्रपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचे अपील खारीज केले आहे.५ फेब्रुवारी २०११ रोजी सत्र न्यायालयाने हत्याप्रकरणातील आरोपीला दोषमुक्त केले होते. या निर्णयाला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अमोल शंकर रुडे (३२) असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर पत्नी शीलाची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप होता. ही घटना ३१ डिसेंबर २००९ रोजी उघडकीस आली होती. घटनेच्या दोन वर्षांपूर्वी आरोपीचे शीलासोबत लग्न झाले होते. त्याला दारूचे व्यसन होते. तो शीलाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दुर्गापूर पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.