शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह मोठे की स्थायी समिती?

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

खासगी वाहनांचा वाद : समितीने घेतला भाडेवाढीचा निर्णय

खासगी वाहनांचा वाद : समितीने घेतला भाडेवाढीचा निर्णय
नागपूर : महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करण्यात आलेल्या भाड्याच्या वाहनांचा सविस्तर अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी जानेवारी महिन्यातील आमसभेत दिले होते. परंतु सभागृहात अहवाल ठेवण्यापूर्वीच स्थायी समितीने कराराला एक वर्षाची मुदतवाढ देऊ न वाहनाच्या नवीन दराला मंजुरी दिली. त्यामुळे सभागृह मोठे की स्थायी समिती, असा वाद निर्माण झाला आहे.
मनपातील पदाधिकारी, अधिकारी, विविध विभागाचे प्रमुख, सहायक आयुक्त तसेच वॉर्ड अधिकारी आदींना वाहने उपलब्ध केली जातात. मनपाने याचे भाडे व भत्ते निश्चित केले आहे. परंतु अधिक दराने अधिकाऱ्यांना भत्ता दिला जात होता. जानेवारी महिन्याच्या आमसभेत हा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. अधिकाऱ्यांना निश्चित केलेल्या भत्त्यापेक्षा ते वापरत असलेल्या वाहनांवर अधिक खर्च होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले होते. यावर विस्तृत हवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. परंतु हा अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. असे असतानाही १६ जुलैच्या स्थायी समितीच्या बैठकीत खासगी वाहन भाडे भत्त्यात वाढ करून कराराला एक वर्षाची मुदतवाढ देण्याला मंजुरी देण्यात आली, असा आरोप नगरसेविका आभा पांडे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)
चौकट..
निर्देशाचे पालन व्हावे
सभागृहात दिलेल्या निर्देशानुसार अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. या बाबत स्थायी समितीने याबाबतचा प्रस्ताव पारित केला असल्यास माहिती घेऊ. सभागृहाच्या निर्देशाचे पालन होणे गरजेचे आहे.
प्रवीण दटके
महापौर, मनपा